
साप्ताहिक राशिभविष्य, २२ जून ते २८ जून २०२५
![]() | वाढते सहकार्यमेष : भागीदारी व्यवसायांमध्ये काही वादविवाद असतील, तर ते संपवण्याची वेळ आहे. कामांमध्ये नीट लक्ष देऊन आणि शांतपूर्ण रीतीने आपले काम करावे. या कालावधीमध्ये जास्तीत जास्त मेहनत व चांगल्या रीतीने काम करण्याचा प्रयत्न करणार आहात. आपणास मित्रांचा सहयोग मिळणार आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात पैशाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार करताना सतर्क असावे. फसवणुकीचे व्यवहार होऊ शकतात. राजनीतील व्यक्तीने भाषा संयमी ठेवावी. या कालावधीमध्ये आपले वाहन कोणालाही देऊ नका. |
![]() | नव्या गुंतवणुकावृषभ : नव्या गुंतवणुका आपणासाठी चांगल्या आहेत. वडिलांचे आपणास पूर्ण सहकार्य लाभणार आहे. ज्या व्यक्ती व्यापार-व्यवसायात आहेत, त्यांना वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये आपणास जर गुंतवणूक करण्याची इच्छा असेल, तर विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. एखाद्या मोठ्या कंपनीकडून आपणास चांगल्यापैकी ऑर्डर मिळणार आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहात. आपले प्रयत्न चांगल्या रीतीने यशस्वी होणार आहेत. आर्थिक फायदे होणार आहेत. व्यापार-व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे. |
![]() | सतर्क राहामिथुन : आपला आत्मविश्वास चांगला असणार आहे. आपली एनर्जी लेव्हल पण उच्च प्रतीची असणार आहे. ज्या व्यक्तींचा व्यवसाय पारंपरिक आहे त्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये आपणास मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, आपण खूप सतर्क राहून काम करा. या कालावधीमध्ये आपण अतिशय कामामध्ये व्यस्त असणार आहात. त्यामुळे घरात व मुलांकडे कमी लक्ष दिले जाऊ शकते. मुलांच्या विद्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यामध्ये जातीने लक्ष घाला. |
![]() | खर्चात वृद्धीकर्क : आपल्या इनकमपेक्षा खर्च खूप जास्त होणार आहे. तरी ती एक प्रकारची गुंतवणूक आहे असे म्हणू शकतो. पुढे जाऊन त्याचा फायदा होणार आहे. ज्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्यापैकी नोकरी मिळणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंद असेल आणि गोडवा असणार आहे. प्रेमी-प्रेमिकांसाठी हा अनुकूल काळ आहे. हा कालावधी आपणासाठी अतिशय अनुकूल आहे. क्रीडा क्षेत्रामधील व्यक्तींना लोक आश्चर्यचकित होतील असे यश मिळणार आहे. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन नवीन संधी येणार आहेत. संधीचे सोने करा. |
![]() | नव्या संधीचा लाभसिंह : आपल्याला व्यापार व्यवसायामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या, त्यामध्ये आपणास मार्ग सापडणार आहे. जे जातक नोकरी शोधत होते त्यांना नोकरी मिळणार आहे. आपले रचनात्मक कार्य कौशल्यामुळे आपले वरिष्ठ खूश होणार आहेत. ज्या व्यक्तींना सुट्टीची आवश्यकता आहे त्यांना सुट्टी मिळणार नाही, असे वातावरण होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये आपणाला नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी आपले चांगले संबंध असणार आहेत. सप्ताहाच्या शेवटी हितशत्रू तोंड वर काढण्याची शक्यता आहे. सांभाळून राहणे आवश्यक आहे. अडचणींवर मात करण्याचे कौशल्य आपणाकडे आहे. |
![]() | जीवनामध्ये मधुरताकन्या : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येणार आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. भागीदारीच्या व्यवसायामध्ये पारदर्शकता असणे फार आवश्यक आहे. खोट्या व चुकीच्या गोष्टींना अजिबात स्थान देऊ नका. हिशोबातील गडबडीमुळे आपणाला खूप त्रास होऊ शकतो. आपल्या प्रकृती स्वास्थ्याला पण आपण जपणे आवश्यक आहे. अचानक प्रकृती बिघडून पुढचा कार्यक्रम बिघडण्याची शक्यता आहे. अचानक घरच्या व्यक्तींचे वागणं बदलल्यामुळे आपण चिंतेत असाल. गर्दीतून वाहने नीट चालवा. |
![]() | उत्पन्नात वाढतूळ : व्यापार-व्यावसायिकांच्या व्यापारात वाढ होणार आहे. पैसे मिळवण्याचे नवीन नवीन मार्ग मिळणार आहेत. आपणाला जर गुंतवणूक करायची असल्यास ती स्थिर मालमत्तेत करू शकता. ज्या व्यक्ती बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळणार आहे. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये आपल्या जोडीदाराच्या मनात कुठले तरी भय उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये सर्व चांगले चालत असून सुद्धा मनामध्ये एक प्रकारचा गोंधळ असण्याची शक्यता आहे, काय करावं आणि काय नाही या मनस्थितीतून आपण जाणार आहात. जुने आजार वर तोंड काढण्याची शक्यता आहे. |
![]() | परदेशगमनवृश्चिक : परदेशांमध्ये प्रवास करण्याचा आपला विचार असेल, त्यासाठी आपण प्रयत्न करत असाल, तर त्यासाठी हा कालावधी अतिशय चांगला आहे. याचा आपण फायदा घ्या. आपण जर आपल्या घरापासून लांब नोकरी करत असाल तर आपल्या इच्छेनुसार आपली बदली होऊ शकते. व्यापार-व्यवसाय असेल तर अनेक ठिकाणी आपणास प्रवास करावा लागणार आहे, त्यामुळे आपले व्यावसायिक संबंध चांगले होणार आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात आपण रचनात्मक ठोस काही कार्य करणार असाल तर आपणासाठी हा कालावधी चांगला आहे. आर्थिकदृष्ट्या चांगला काळ. आपले निर्णय योग्य ठरतील. |
![]() | अध्यात्माकडे कलधनु : आपल्या बहीण-भावाविषयी आपले संबंध मधुर होणार आहेत. आपण जर व्यापार, व्यवसाय करत असाल तर आपल्या वडिलांचे सहाय्य आपणास मिळणार आहे. आपला देवावर विश्वास बसण्याची शक्यता आहे. अध्यात्मामध्ये आपणास गोडी निर्माण होणार आहे. एखाद्या धार्मिक मंगल कार्याचे आयोजन आपल्याकडे होऊ शकते. आपल्या कार्यक्षेत्रात थोड्याफार अडचणी येऊ शकतील, पण त्याची काळजी करण्याची जरूर नाही. आपल्या जोडीदाराचे आपल्याला पूर्ण सहकार्य असणार आहे. आपण व आपला जोडीदार एकमेकांना चांगले समजून घेणार आहात. कार्यक्षेत्र वाढेल. |
![]() | धैर्याची व पराक्रमाची वाढमकर : आपल्यामधील धैर्याची आणि पराक्रमाची वाढ होणार आहे. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये आपले परिश्रम वाढणार आहेत. जे काम आपण केले आहे याचा फायदा निश्चित मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील टार्गेट आपण सहज पूर्ण करणार आहात. आपला या कालावधीमध्ये प्रवास होण्याचीही शक्यता आहे. जे विद्यार्थी टेक्निकल साईडला आहेत त्यांना विशेष येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात किंवा विद्यार्थ्यांनी अभ्यासात अजिबात आळस करू नका. जे पीएच.डी. किंवा संशोधनाचे कार्य करत आहेत त्यांना चांगले यश मिळेल. प्रवासात नवीन मित्र मिळतील. |
![]() | नोकरीच्या संधीकुंभ : जे व्यक्ती नोकरी शोधत होत्या, त्यांचा शोध थांबणार आहे. त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. नोकरीमध्ये चांगल्या संधी येणार आहेत. वारसा हक्काच्या संपत्तीमध्ये वाद चालले होते, ते मिटवून आपणास त्याचा लाभ होणार आहे. आपला खर्च काही कपड्यालक्त्यांवर होईल. काही पैशांची गुंतवणूक सोन्यामध्ये करणार आहात. तयार कपडे आणि सौंदर्य प्रसाधने यामध्ये ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांना चांगले फायदे होतील. व्यवसायातील नफ्याचे प्रमाण वाढणार आहे. ज्या व्यक्ती नोकरी करत आहे, त्यांनी पहिल्यापेक्षा जास्त परिश्रम घेतल्यास त्यांच्या ऑफिसमध्ये वेगळी अशी ओळख निर्माण होईल. |
![]() | व्यवसाय वुद्धीमीन : व्यापार व्यवसायिकांना जर व्यवसायासाठी कर्ज हवे असेल, तर ते त्यांना मिळणार आहे. नवीन व्यवसायिकांना याचा चांगला फायदा होणार आहे. आपली मालमत्ता विकायची असल्यास, त्यामध्ये सुद्धा आपणास चांगला फायदा मिळणार आहे. आपल्या आई किंवा पत्नीच्या नावाने जर शेअर्स असतील, तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांनी मात्र आपल्या वागण्या-बोलण्यात काळजी घ्या. आपल्या अधिकारी व्यक्तीशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. |