Saturday, June 27, 2026

साप्ताहिक भविष्य, २८ जून २०२६ ते ४ जुलै २०२६

साप्ताहिक भविष्य, २८ जून २०२६ ते ४ जुलै २०२६

साप्ताहिक भविष्य, २८ जून २०२६ ते ४ जुलै २०२६

शुभ बातम्या मिळतील

मेष : सुरुवातीलाच सुख संविधान मध्ये वाढ होणार आहे. शुभ बातम्या मिळतील. बाजारामध्ये मंदी असली तरी आपल्याकडे लोकांचे येणे-जाणे वाढण्याची शक्यता आहे. आपला आत्मविश्वास भरपूर असणार आहे . जुने काही राहिलेली कामं तीसुद्धा पूर्ण होणार आहेत. सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये थोडेसे मानसिक तणाव राहणार आहे. या कालावधीमध्ये आपण धैर्याने सावधतेने पावले टाकली पाहिजे . सामाजिक दृष्ट्या मानहानीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीकोनातून आपण सावध राहिले पाहिजे. तसंच काही अशुभ ग्रहांच्या गोचर भ्रमण मुळे ज्या व्यक्ती शासकीय कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहे त्यांना अडचणी येण्याची शक्यता आहे.

मान प्रतिष्ठा- सामाजिक स्तर उंचावणार

वृषभ : या सप्ताहात ग्रह योग आपणास अनुकूल असणार आहे. तुम्ही विचार केलेले आणि नियोजित केलेली कामे, त्याच प्रमाणे होणार आहेत. भौतिक सुखात बरोबरच ऐश्वर्या संपन्नता वाढणार आहे. आनंदात व मौज मजेत वेळ घालवणार आहात. बराच काळ घरातील वादळ असतील ते संपणार आहेत. आपल्या मुलांकडून काही शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. आपला मान प्रतिष्ठा सामाजिक स्तर उंचावणार हा कालावधी असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आपणास चांगले लाभ मिळणार आहेत. तरी आता परत गुंतवणुकीचा प्रश्न समोर येणार आहे. त्याचा निर्णय मात्र अतिशय विचारपूर्वक घेण्याची आवश्यकता आहे. एखादी स्थिर संपत्ती आपण खरेदी करू शकता.

सहाय्य मिळणार आहे

मिथुन : आपल्या राशीतील शुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे प्रेमी युगुलांचा साठी हा कालावधी आहे. तुम्ही एकमेकांना भरपूर वेळ देऊ शकता शिवाय हा कालावधी आपल्या घरच्यांना सांगू शकता.आपली एनर्जी लेव्हल उच्चप्रतीची असणार आहे. आपणास एखादी चांगली बातमी समजू शकते, किंवा खूप दिवसापासून अडकलेले पैसे आपणास मिळू शकतात. कुटुंबाच्या दृष्टीकोनातून आताचे वातावरण आपणासाठी सुखदायक असणार आहे. कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांना सहाय्य मिळणार आहे. कामाची धावपळ असूनही आपणास उत्साह वाढणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची प्रकृतीमध्ये सुधारणा होणार आहे सप्ताहाच्या शेवटी आपली काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील.  

भाग्याची दारे उघडणार आहेत

कर्क : ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये नीरसता आली होती, किंवा कंटाळवाणी जीवन वाटत होते, त्यांना आता आनंद आणि आशा निर्माण होणार आहे. व वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येणार आहे. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडणार नाही. त्यांच्या सांगण्यावरून आपण एखादी महाग भेट वस्तू पण त्यांना तुम्ही देऊ शकता. सरकारी नोकरी करणाऱ्यांना पूर्वीचे काही येणे असेल,ती येणी येतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवास होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींना संततीसाठी बरेच दिवस वाट बघायला लागली आहे, त्यांच्यासाठी संतती प्राप्ती चे शुभयोग होत आहेत. आपल्यासाठी भाग्याची दारे उघडणार आहेत.  

आर्थिक दृष्ट्या प्रगती पथावर राहाल

सिंह : आपल्या राशीतून शुभ ग्रहांचे गोचर भ्रमण आपल्यासाठी आर्थिक बाबतीत खूप चांगले राहणार आहे. आपणास गुंतवणूक करायची असल्यास दीर्घ मुदतीची गुंतवणूक आपण करू शकता. त्यामध्ये आपणास बराच फायदा होणार आहे. आपण अर्थ प्राप्तीसाठी बरेच प्रयत्न करणार आहात. पण आपणास कमी कष्टात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. आपली ज पार्टनरशिप असेल तर त्यामध्ये सुद्धा आपणास आर्थिक फायदा होणार आहे. आर्थिक बाबतीत आईवडिलांची काही वाद-विवाद होऊ शकतात पण वडिलांकडून प्रत्यक्षात फायदा होण्याची आशा आहे. व्यापार-व्यवसायात चांगला व्यवस्था झाल्यामुळे आर्थिक प्रगती होणार आहे एकूणच आर्थिक दृष्ट्या प्रगतीपथावर असणार आहे.

मित्रांचा सहयोग मिळणार

कन्या : व्यापार व्यवसायामध्ये अपेक्षित आर्थिक फायदा होणार नाही. उत्पन्न कमी असल्यामुळे आणि जास्त खर्च असल्यामुळे आपली बचत खर्च होण्याची शक्यता आहे.लहान बहिणीचा प्रेम प्रकरण समोर आल्यामुळे आपली मानसिकता खराब होण्याची शक्यता आहे. पण मुलगा आपल्याच जातीचा असल्यामुळे पुढे हे लग्न होण्याची शक्यता आहे. आपली एखादी महत्त्वाची वस्तू बरेच दिवस सापडत नसल्यामुळे आपण बेचैन असाल, ती वस्तू आपणास आत्ता मिळणार आहे. त्यामुळे आपण निश्वास टाकणार आहात. ज्या व्यक्ती नोकरी करत आहे, त्यांचे नोकरीतील वातावरण सकारात्मक असणार आहे. त्यामुळे आपण आनंदी असणार आहात. आपणास मित्रांचा सहयोग मिळणार आहे.

यश मिळणार आहे

तूळ : परिवारामध्ये शांती चे वातावरण असणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये जे काही गैरसमज झाले होते ते दूर होणार आहेत. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळणार आहे, या यशामुळे आपले स्थान आपण बळकट करणार आहात. आपले खाणे पिणे आपण वेळेवर करावे, अन्यथा त्याचा परिणाम प्रकृती स्वास्थ्यावर होण्याची शक्यता आहे.उच्च शिक्षणासाठी आपणास स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते. आपली मानसिक अस्वस्थता दूर होणार आहे. आपली वाटचाल धैर्याने व संयमाने होणार आहे. पूर्वी केलेल्या बचतीचा आपणास आत्ता उपयोग होणार आहे. आर्थिक दृष्टीने आपण समाधानी रहाल. आपणास नाव कीर्ती मिळणार आहे. सरस्वती चा आशीर्वाद असणार आहे.

परदेशी प्रवासी योग येतील

वृश्चिक : व्यापार व्यवसायिकांना अतिशय चांगला कालावधी आहे. ज्यांचे व्यवसाय हॉटेल रेस्टॉरंट अशा प्रकारचे व्यापार आहे त्यांना अतिशय उत्तम. परदेशी प्रवासी योग येतील, आणि इतरही व्यक्ती येऊन हॉटेल फुल असणार आहेत. हा व्यवसाय जोरात चालणार आहे.कला क्षेत्रातील व्यक्तींना पण हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. नवीन प्रस्ताव येतील, कामे भरपूर प्रमाणात मिळतील, प्रसिद्धी भरपूर होईल.ज्या व्यक्ती नोकरी करत आहे त्यांना पण हा कालावधी चांगला असणार आहे नोकरी मध्ये चांगली स्थिती असेल. मान सन्मान वाढ होईल. आपले अधिकारी व्यक्ती आपल्यावर खुश असणार आहे. आपणास प्रत्येक कार्यामध्ये यश मिळणार आहे. आपणास विविध मार्गाने धनप्राप्ती होणार आहे.  

कामे सहजरीत्या करू शकता

धनु : हा चांगला कालावधी आहे.ज्या व्यक्ती शासकीय कामामध्ये,, सरकारी कामांमध्ये आहे, त्यांना प्रमोशन मिळू शकते. ज्या व्यक्ती खाजगी नोकरी करतात त्यांना पगार वाढ मिळू शकते. जर आपल्या मध्ये जास्त चांगली क्षमता असल्यास मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर आपली नियुक्ती होऊ शकते. आपल्या कार्यकुशलतेने मुळे आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला चांगले यश मिळणार आहे. ज्या व्यक्तींचा व्यापार व्यवसाय कपड्यांचा, तयार कपडे, ब्युटी पार्लर याच्या संबंधी आहे. त्यांना आताचा कालावधी चांगला सिद्ध होणार आहे. जर आपणास व्यापारामध्ये वाढ करायची असेल तर काही प्रकारच्या जोखीम उचलावी लागणार आहे. जबाबदारी जास्त वाढणार आहे. पण आपल्या मधील आत्मविश्वास चांगला असल्यामुळे आपण ही कामे सहजरीत्या करू शकता. आपणा साठी हा उत्तम कालावधी आहे.  

अपेक्षित आर्थिक लाभ मिळतील

मकर : भागीदारीमध्ये काही आव्हानात्मक गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे.वैवाहिक आयुष्यामध्ये जर आपला जोडीदार नोकरी किंवा काही काम करत असेल तर, आपल्यामध्ये काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. हे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. गैरसमज दूर झाल्यावरच वैवाहिक जीवनाचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. त्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. जोडीदाराबद्दल थोडी सहानुभूती दाखवणे आवश्यक आहे. व्यापार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास चांगल्या तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तरच आपल्याला अपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी आपला जोडीदार आपल्याला सहाय्य करणार आहे.

आनंददायक कालावधी

कुंभ : शेअर बाजारांमध्ये आपल्याला फायदा होणार आहे. तसेच जमीन जुमला मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक लाभ होणार आहे. यात्रा कंपनींना हा कालावधी व्यापारी दृष्टीने चांगला आहे. त्यात विदेशी प्रवास कंपनी यांना अतिशय उत्तम कालावधी आहे. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर तसेच बिल्डिंग मटेरियल संबंधित व्यावसायिकांना आर्थिक लाभ उत्तम होणार आहे. मात्र गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये नवीन घर खरेदी करण्याची शक्यता आहे. किंवा घरामध्ये नूतनीकरण चे काम करून घ्याल.हा कालावधी आपणास आनंददायी ठरणार आहे.  

सकारात्मक दृष्टीने पुढे जावे

मीन : आपले वरिष्ठ त्यांचे स्वतःचे काम तुमच्या वर टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढणार आहे. त्यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. आपणास वाटले तरी आपण त्यांना विरोध करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटेल की आपली बदली व्हावी.महिलांना सासरी कलह किंवा वादविवादाला सामोरे जावे लागणार आहे. अशावेळी आपण आपला आत्मविश्वास वाढून धीराने समोर गेले पाहिजे. हा कालावधी जास्ती चालणार नाही. त्यामुळे आपणास सकारात्मक दृष्टीने पुढे जावे लागणार आहे. तर आपली प्रगती होणार आहे.विद्यार्थ्यांनी जास्त कष्ट घेतले पाहिजेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा