Saturday, July 11, 2026

साप्ताहिक भविष्य, १२ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६

साप्ताहिक भविष्य, १२ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६

साप्ताहिक भविष्य, १२ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६

सुसंवाद राहणार आहे

मेष : या सप्ताहात यश आणि समृद्धी चा कालावधी असणार आहे.कल्पक दृष्टिकोन आणि संधी यामुळे तुम्हाला थोडे अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी आणि अधिकाऱ्यांशी तुमचा सुसंवाद राहणार आहे. व्यवसाय मध्ये वाढ होणार आहे. हा कालावधी आपणासाठी चांगला असणार आहे. मात्र कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात. त्यामुळे आपण चिंताग्रस्त होण्याची शक्यता आहे.आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त दगदग करू नका. नवीन प्रकल्प हाती घेताना विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे.

आयुष्यात आनंद निर्माण होणार आहे

वृषभ : आपल्या कुटुंबामध्ये एकजूट व समजूतदारपणा वाढणार आहे. तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांकडून शिकण्यासाठी हा अनुकूल कालावधी आहे. मित्र व अनोळखी व्यक्तींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आपणास लाभकारक ठरणार आहेत. आपण चांगल्या कामासाठी दानधर्म कराल. मुलांना ही यश मिळेल. तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होणार आहे. साधारण या सप्ताहामध्ये सुखासीन आयुष्य असणार आहे. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र उद्योग-व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या तज्ञांचा सल्ला आवश्यक वाटल्यास घेणे आवश्यक आहे.

सक्षम असणार आहात

मिथुन : या सप्ताहामध्ये आपण मानसिकदृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असणारा आहात. आपल्या करिअरमध्ये आपण चांगले प्रयत्न कराल. त्यामध्ये चांगले यश आपणास मिळणार आहे. आपल्या काही इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. मात्र आपले काम वाढणार आहे. त्यामुळे आपल्यावर ताण येऊ शकतो. मानसिक शांतता कमी होऊ शकते. आपणास परदेशातील हितसंबंध उपयोगी पडणार आहेत. वरिष्ठांशी आक्रमकपणे वाकू नका. स्वतःच्या क्षमतांचा चांगला वापर करा. नवीन प्रोजेक्ट किंवा करार गुंतवणूक करताना दूरदृष्टी असू द्या.  

सकारात्मक रहा

कर्क : या सप्ताहामध्ये तुमचे धाडस आणि अंदाज हे तुमची बलस्थाने असणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत मोठी गुंतवणूक करू नका. आपल्या अपेक्षा प्रमाणे त्याचे फायदे होणार नाहीत. आपल्या कामात ठिकाणी स्पर्धा असणार आहे. कामामध्ये वाद टाळणे आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टीने काम केल्यास अधिक चांगले होणार आहे. आर्थिक दृष्टीने आपण सावध असणे आवश्यक आहे. काम पुष्कळ असणार आहे. आपण नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. आपली गुंतवणूक हुशारीने होऊ शकते.  

आर्थिक उन्नतीचा कालावधी

सिंह : या सप्ताहात आपण आक्रमक होऊ नका. आपण अडचणीत येऊ शकता.आपण आपले नाते सांभाळा नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. आपल्या प्रत्येक समस्या आपोआप सोडवल्या जातील. घराचे व्यवहार खूप चांगल्या प्रकारे होणार आहेत. आपली इच्छाशक्ती चांगली असणार आहे. आपल्यामध्ये ऊर्जा ही चांगल्या प्रकारची असणार आहे. उच्चभ्रू लोकांकडून आपणाला मदत मिळेल. आपल्या आजूबाजूचे वातावरण अतिशय चांगले असेल. नवीन व्यवसाय किंवा नवीन करार आपणासाठी लाभदायक ठरणार आहे.आर्थिक उन्नतीचा हा कालावधी असणार आहे.

योजना कार्यान्वित होण्यासाठी उत्तम कालावधी

कन्या : तुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील व आपला विकास होईल. तुमच्या वरिष्ठ व सहकारी यांच्याशी सुसंवाद ठेवा. उत्पन्नाचे स्त्रोत चांगले राहतील. अध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही सक्रिय राहणार आहात. आपली दृष्टी सकारात्मक ठेवा तर हा कालावधी आपणासाठी उत्तम राहणार आहे. गुंतवणूक केली असता चांगले फायदे मिळतील. या कालावधीमध्ये चैनीच्या वस्तूंची खरेदी होणार आहे. आर्थिक दृष्ट्या कालावधी वाईट नाही पण खर्चावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. तुमच्या योजना कार्यान्वित होण्यासाठी हा कालावधी चांगला असणार आहे.  

घेतलेले निर्णय बरोबर ठरणार आहेत

तूळ : आपल्यामध्ये उत्साह आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात असणार आहे. आपण घेतलेले निर्णय बरोबर ठरणार आहेत. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या सहकाऱ्यांची वाद होऊ नये एवढी मात्र काळजी घेणे फार आवश्यक आहे.कौटुंबिक पातळीवर अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही चांगली उंची गाठणार आहात. आपणाला मोबदला पण अपेक्षेप्रमाणे मिळणार आहे. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे. कौटुंबिक आयुष्य सुखी असणार आहे. सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी होऊ शकते.

सहकार्यात वाढ

वृश्चिक : कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्यात वाढ होणार आहे. तुमच्या पासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळणार आहे. नवीन कामे मिळतील ही कामे अत्यंत फायदेशीर होणार आहेत. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने समोर जाणार आहात. आर्थिक बाबतीत तुमचं नशीब चांगले असणार आहे. प्रवासात चांगले मित्र भेटतील. राजकीय व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी चांगले संबंध होणार आहेत. कुटुंबामध्ये वाढ होईल. एकापेक्षा अनेक उद्योगातून आपणाला उत्पन्न मिळू शकते.  

प्रगतीपथावर नेणारा कालावधी

धनु : आपली कष्ट करायची तयारी असेल तर हा काळ आपणाला यश निश्चित देणार आहे. नवीन संधी मिळणार आहे. घरी किंवा कार्यक्षेत्रात होणारे नवीन बदल आपल्या पथ्यावर पडणार आहेत. आपले निर्णय आपणासाठी प्रगतीपथावर नेण्यासाठी चांगले असणार आहेत. आपल्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी आपणाला इतरांची मदत मिळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष होऊ देऊ नका. एखाद्या व्यवहारात आपणास चांगला आर्थिक फायदा होणार आहे. वाहन खरेदी किंवा मालमत्तेची खरेदी होऊ शकते.  

सकारात्मक असाल

मकर : व्यावसायिक आघाडीवर फार उत्साहवर्धक काही घडणार नसले, तरी त्याचा मनस्ताप करून घेऊ नका. कुठल्याही परिस्थितीत भावनेच्या आहारी जाऊ नका. अपेक्षाभंग यामुळे नोकरी सोडण्याची इच्छा दूर करा.कौटुंबिक आयुष्यात ताण तणाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे. यातून आपणास आर्थिक लाभ होणार आहे. आपल्या व्यक्तिगत विश्वासात भर पडणार आहे. स्वप्न आणि तत्वे यावर निश्चित प्रभाव पडेल.शत्रूवर डोके काढू शकणार नाही. वातावरण आनंदी असणार आहे. या कालावधीमध्ये आपण पूर्णपणे सकारात्मक असाल.

कार्यक्षेत्रात विस्तार करण्याच्या संधी प्राप्त होतील

कुंभ : कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका. आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात चुकीच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीचे व्यवहार पूर्णपणे टाळा.लहानसहान गोष्टीवरून वाद विवाद करू नका. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना बरोबर चांगले संबंध ठेवल्यास तुम्हाला पुढील वाटचालीसाठी फायदा होणार आहे. कुठल्याही कल्पनांचा दोन्ही बाजूने विचार करून मगच त्या अमलात आणाव्यात. प्रवास लाभकारक होणार आहेत. अनेक नवीन कल्पना सुचतील तुमचे चांगले संबंध आणि संवाद यातून तुम्हाला नवीन कामे मिळतील कार्यक्षेत्रात विस्तार करण्याच्या संधी प्राप्त होतील.  

दिलासा मिळणार आहे

मीन : आपल्या तणावापासून आणि अडचणी पासून आपल्याला दिलासा मिळणार आहे. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकारी व्यक्तींकडून तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. मात्र वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. आपण आपली कामे धाडसाने पूर्ण कराल. प्रभावशाली व्यक्ती कडून आपल्याला सहकार्य मिळणार आहे. नोकरीमध्ये अनुकूल काळ आहे. पगार वाढ किंवा बढती होऊ शकते. मात्र कामाच्या ठिकाणी किंवा घरी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. कोणी आपले खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर सकारात्मकतेने पहाणे आवश्यक आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा