मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक चालवणार आहे. माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.



ठाणे येथून ११.०७ ते १५.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान, अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.


मानखुर्द आणि नेरुळ दरम्यानच्या अप आणि डाउन हार्बर मार्गावरील सेवा ११.१५ ते १६.१५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.१८ ते १५.२८ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.३७ ते १५.४५ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - मानखुर्द आणि पनवेल - नेरुळ/ठाणे दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

Comments
Add Comment

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.