आयर्नमॅनची अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये यशस्वी धाव

शहापूर : जगातील सर्वात कठीण ‘अल्ट्रा मॅराथॉन कॉमरेड्स मॅराथॉन’ अंतर ९० कि.मी. साऊथ आफ्रिका या देशातील डर्बन ते पीटर्समार्गबर्ग शहरांमध्ये घेण्यात येते. या वर्षी सदर कॉमरेड मॅराथॉन स्पर्धा दिनांक ८ जून रोजी पार पडली. ही स्पर्धा सलग दोन वर्षं यशस्वीरित्या पूर्ण करून ठाणे वनवृत्तातील शहापूर वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी वाशाळा या पदावर कार्यरत असलेले विशाल विठ्ठल गोदडे यांनी नवा विक्रम नोंदविला आहे.


असा विक्रम करणारे ते भारतीय वनविभागातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत. सदरची स्पर्धा त्यांनी ११ तास ३२ मिनिटे एवढया वेळात पूर्ण केली आहे. तसेच गेल्या वर्षी ९ जून २०२४ रोजी ही स्पर्धा त्यांनी ११ तास ३५ मिनिटे एवढया वेळात पूर्ण केली होती. त्यासाठी त्यांना विशेष पदक प्राप्त झाले आहे.


यापूर्वी मलेशिया या देशातील लंकावी या ठिकाणी दिनांक ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या जगातील सर्वात कठीण एक दिवसीय ‘आयर्नमॅन’ या स्पर्धेत सहभागी होऊन सदर स्पर्धा १५ तास ४३ मिनिटांत पूर्ण करुन पहिल्याच प्रयत्नात ‘आयर्नमॅन’ हा जागतिक बहुमानाचा किताब देखील त्यांनी मिळविलेला आहे.


सदरचा किताब मिळवणारे भारतीय वन विभागातील ते पहिलेच अधिकारी आहेत. त्यानंतर १० सप्टेंबर, २०२३ रोजी जगातील समुद्रसपाटीपासुन सर्वात उंच ठिकाणी होणारी लडाख मॅराथॉन देखील त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. हे यश प्राप्त करण्यासाठी त्यांची पत्नी पूजा गोदडे यांची त्याचप्रमाणे कोच अमित कुमार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची आर्थिक झेप अभिमानास्पद

मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रक्तदान स्वर्गीय दिघे साहेबांची परंपरा

कल्याण - डोंबिवलीत मतदानापूर्वीच कमळ फुललं: भाजपाची विजयाची हॅट्रिक

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच भाजपाला मोठे यश

ठाण्यात गावदेवी मातेचा पालखी सोहळा

ठाणे : ठाणे पूर्व भागातील आई चिखलादेवी (गावदेवी) मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेमध्ये दिनांक ०२ जानेवारी २०२६

मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक

युतीसाठी शिवसेनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम भाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक युतीसंदर्भात शिवसेना आणि

ठाण्यात घराणेशाहीचा वाद चिघळला

खा. नरेश म्हस्केंच्या मुलाच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

कडोंमपा निवडणुकीसाठी महायुतीत धुसफूस

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघडकीस