Pandharpur : पंढरपुरात दुर्घटना! चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू...

पंढरपूर : पंढरपुरात पुराची परिस्थिती निर्माण होत असताना शुक्रवारी (दि.२०) चंद्रभागा नदीत एक दुर्घटना घडली. पुंडलिक मंदिराजवळ चंद्रभागा नदीत बुडून बेळगाव येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शुभम पावले (२७) या अस नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नावं आहे.  शुभम आपल्या मित्रांसोबत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आला होता. शुक्रवारी (दि. २०) सकाळी तो मित्रांसह चंद्रभागा नदीत पवित्र स्नानासाठी गेला होता. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले. तब्बल ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शुभमचा मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेमुळे पंढरपूर आणि बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आषाढी यात्रेवर महापुराचे सावट निर्माण आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे प्रशासनाने भाविकांना सतर्कतेचा इशारा गुरूवारी (दि. १९) दिला होता.आषाढीसारख्या पवित्र सोहळ्याच्या तोंडावर अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या