Pratap Sarnaik : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रुग्णालयात

  60

ठाणे : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ताप आला आणि अंगदुखीचा त्रास वाढला. यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजारी असल्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यावर बुधवारपासूनच उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी प्रताप सरनाईक यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कमंत्री म्हणून कार्यरत आहेत. तब्येत बिघडल्यामुळे बुधवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तापामुळे प्रताप सरनाईक यांना अशक्तपणा जाणवत आहे. पण त्यांच्या कोरोना, डेंग्यू आणि टायफॉइडच्या आतापर्यंत केलेल्या चाचण्या नकारात्मक आल्या. सरनाईक यांना कोरोना, डेंग्यू, टायफॉइड झालेला नाही, असे चाचणीचे अहवाल बघून डॉक्टरांकडून सांगण्यात आले. उपचार सुरू आहेत आणि प्रताप सरनाईक विश्रांती घेत आहेत. लवकरच त्यांच्या तब्येतीला आराम पडेल, असे डॉक्टरांनी सांगितले.
Comments
Add Comment

आदित्य ठाकरेची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन आणला मांत्रिक!

शिवसेना नेते रामदास कदम यांचा आरोप मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या, जादूटोणा आणि तांत्रिक

School Holidays List : यंदा शाळांना १२८ दिवस सुट्ट्या; शिक्षण विभागाने केली यादी जाहीर!

शालेय शिक्षण विभागाने वर्षभरातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार शाळा तथा विद्यार्थ्यांना ५२ रविवार

कधी उडणार भारतात उतरलेले इंग्लंडचे F35B विमान ?

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक शक्तिशाली लढाऊ विमानांमध्ये एफ ३५ बी स्टेल्थ लाइटनिंग टू लढाऊ विमानाचा समावेश होतो.

Finolex Cables: पुण्याच्या प्रतिष्ठित पालखी सोहळ्यादरम्यान फिनोलेक्स केबल्सचा वारकरी समुदायाला पाठिंबा

प्रतिनिधी: आपल्या मूळ स्रोतांना मानवंदना आणि समाज कल्याणाच्या सततच्या प्रतिबद्धतेच्या रूपाने,  भारतातील

Hindalco News: हिंडाल्कोकडून १२५ दशलक्ष डॉलरमध्ये अमेरिकेतील ॲल्युकेम कंपनीज इन्कचे अधिग्रहण !

उच्च-तंत्रज्ञान असलेल्या अ‍ॅल्युमिनामधील जागतिक स्पर्धक विस्तारासाठी पाऊल लो सोडा टॅब्युलर

कसोटी सामन्यात ऋषभ पंत सातव्या स्थानी

लीड्स : इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत ने उत्तम कामगिरी केली आहे . कसोटी क्रिकेट च्या इतिहासात