मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न, जळगावात खळबळ

  82

जळगावमध्ये एका व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न केला.


जळगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामध्ये घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगवाच्या आकाशवाणी चौक परिसरात ही घटना घडली. मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच ही व्यक्ती समोर आली आणि त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीची रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला . पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौऱ्यावर असून. त्यांचा ताफा जळगाव शहरामध्ये दाखल होताच या ताफ्यामध्ये घुसून एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. संजय वराडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.



'या' कारणामुळे केला आत्मदहनाचा प्रयत्न 


शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने संजय वराडे या ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.  या घटनेमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली. सदर घटनेनंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यामुळे शहरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ