Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

  287

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे बुकींग साधारण २३ जूनपासून सुरु होत आहे. यंदा गणेशोत्सव बुधवार दि.२७ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. त्यामुळे कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी ६० दिवस आधी रेल्वे गाड्यांचे आरक्षण करावे लागणार आहे. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण आता गणेश चतुर्थीची तारीख पहाता साधारण २३ जूनपासुन सुरु करावे लागणार आहे. तरीही गणेश चतुर्थीच्या आधी २ दिवस चाकरमानी कोकणात जात असल्याने २५ आणि २६ ऑगस्टला कोकणात पोहचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांच्या आरक्षणाला जादा मागणी असणार आहे.


गेल्यावर्षी गणपती बाप्पाचे आगमन शनिवार ७ सप्टेंबर २०२४ रोजी झाले होते. यावर्षी १२ दिवस अगोदर म्हणजे बुधवार दि. २७ ऑगस्ट रोजी गणपत‌ी बाप्पाचे आगमन होत आहे. त्यामुळे ६० दिवसआधी आगाऊ आरक्षणाच्या तारखांचा चार्ट खालीलप्रमाणे असणार आहे




  • २३ जून, सोमवार – २२ ऑगस्ट, शुक्रवार

  • २४ जून, मंगळवार – २३ ऑगस्ट, शनिवार

  • २५ जून, बुधवार – २४ ऑगस्ट, रविवार

  • २६ जून, गुरुवार – २५ ऑगस्ट, सोमवार

  •  हरितालिका
    २७ जून, शुक्रवार – २६ ऑगस्ट, मंगळवार

  • श्री.गणेश चतुर्थी
    २८ जून, शनिवार – २७ ऑगस्ट, बुधवार

  • ऋषी पंचमी
    २९ जून, रविवार – २८ ऑगस्ट, गुरुवार

  • ३० जून, सोमवार – २९ ऑगस्ट, शुक्रवार

  • ०१ जुलै, मंगळवार – ३० ऑगस्ट, शनिवार

  • गौरी आगमन
    ०२ जुलै, बुधवार – ३१ ऑगस्ट, रविवार

  •  गौरी पूजन
    ०३ जुलै, गुरुवार – ०१ सप्टेंबर, सोमवार

  • गौरी गणपती
    ०४ जुलै, शुक्रवार- ०२ सप्टेंबर, मंगळवार




२५०हून अधिक गणपती स्पेशल रेल्वे


कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते. या गाड्यांचे आरक्षण सुरु होताच फुल होत असते. इतकी प्रवाशांची गर्दी कोकणात गणपतीत जाण्यासाठी असते. त्यामुळे मध्य रेल्वे कोकण मार्गावर २५०हून अधिक गणपती स्पेशल गाड्यांना सोडत असते. या गाड्यांना देखील गर्दी होत असते. मुंबई गोवा मार्गाची अवस्था बिकट असल्याने यंदाही चाकरमान्यांना रेल्वेचा प्रवास बरा पडणार आहे.



पावसाळी वेळापत्रक जारी


कोकण रेल्वेने पावसाळ्यात ट्रेनची वाहतूक नीट व्हावी यासाठी जागोजागी पेट्रोलिंगसाठी सहाशेहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. कोकण मार्गावर आता पावसाळी वेळापत्रक लागू झाले आहे. या काळात कोकणातील ट्रेनना कमी वेगाने चालवले जाते. चार महिने पावसाळी वेळापत्रकानुसार ट्रेनची वाहतूक होत असते.


Comments
Add Comment

गणपती बाप्पाचा खड्ड्यांनी भरलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास

कोकणात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविक करतात तारेवरची कसरत मुंबई : गणेशोत्सवाची चाहूल लागली की कोकणातल्या

कोकणात जाणाऱ्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू

कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला धावणार

रत्नागिरी : दोन अल्पवयीन मुलींचे जंगलात मृतदेह सापडले, चिपळूणमध्ये घटनेनं खळबळ

चिपळूण तालुक्यातील खडपोली गावात दोन आदिवासी अल्पवयीन बहिणींचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने

मुंबई-गोवा महामार्गावर चालत्या एलपीजी टँकरमधून गॅस गळती

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास चरवेली-कापडगावदरम्यान जयगडवरून कर्नाटककडे

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा

रायगड : पेणमधून यंदा दुप्पट गणेशमूर्ती परदेशात रवाना

रायगड जिल्ह्यातील गणेश मूर्तीकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा ४५ हजारांहून अधिक गणेशमूर्ती