Textile Sector Breaking: भारतात टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये होणार लक्षणीय वाढ -अहवाल 'ही' आहेत महत्वाची कारणे!

प्रतिनिधी: भारतात टेक्स्टाईल (Textile) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे असे सिस्टीमॅटिक्स रिसर्च (Systematix Research Report) कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे. व्हिएतनाम देशातील कारागिरांच्या मजू रीत झालेली वाढ, तसेच बांगलादेशमधील अस्थिरता आणि घटलेली अर्थव्यवस्था या कारणांमुळे भारतात टेक्स्टाईल क्षेत्र नवी भरारी घेऊ शकते. मात्र या अहवालात म्हटल्याप्रमाणे, टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये नव्या आव्हानांना सामोरे जावे ला गेल. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेले टेरिफ, उत्पादनाचा अतिरिक्त खर्च, निर्यातीतील टेरिफ मधील बंधने, तसेच घटलेले नफ्याचे मार्जिन यामुळे परिस्थिती या क्षेत्राला तितकीशी सोपी नाही.

दुसरीकडे महत्वाच्या पाश्चिमात्य देशात कपड्यांची घटलेली मागणी, वाढता खर्च यामुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊ शकतो. अखेरीस त्याचा अतिरिक्त भार ग्राहकांवर पडू शकतो. त्यामुळे एकंदर किंमतीत देखील वाढ होऊ शकते असे निरिक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. मात्र बांगलादेशातील राजकीय अस्थिरता, व्हिएतनाम मधील कापड उद्योगांचे कोलमडलेले बजेट, वाढता मजूरी खर्च यामुळे तो बाजार भारतात अधिक सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक देखील होऊ शकते असे अहवालात म्हटले गेले आहे.

भारताकडे आता या क्षेत्रातील जागतिक दर्जाचे हब बनण्याची आयती संधी चालून आली आहे. याशिवाय अहवालाने हे देखील म्हटले आहे की,' व्हिएतनाम वाढत्या कामगार खर्चाशी झुंजत आहे, तर बांगलादेश राजकीय अस्थिरतेशी झुंजत आहे,‌ त्यामुळे भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील स्पर्धात्मकतेत वाढ होऊ शकते '.

अहवालातील माहितीनुसार, टेक्स्टाईल क्षेत्राने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये चांगली कामगिरी केली होती. साधारणतः कापड कंपन्यांच्या वार्षिक महसूल (Annual Revenue) मध्ये वार्षिक बेसिसवर (YoY) ५% वाढ झाली होती तर करपूर्व नफा (EBITDA) ३ टक्क्याने घटला होता. करोत्तर नफा (Profit After Tax PAT) मध्ये ३% वार्षिक वाढ झाली होती. विशेषतः करोत्तर नफ्यात झालेली घट ही कमी झालेला बाजारातील वोल्युममुळे व आयात निर्यातील टेरिफ शुल्कातील चढउतार यामुळे झाली होती.

स्पिनिंग कंपनीच्या स्थूल मार्जिन (Gross Margin) मध्ये १०% वार्षिक वाढ झाली आहे मुख्यतः कॉटनच्या किंमती तिमाहीत २% घसरल्याने वाढ झाली. गारमेंट व्यवसायात तर मोठ्या प्रमाणात बाजाराने देशात पुनरागमन केले होते. इयर ऑन इयर बेसिस (YoU) , मध्ये १० टक्क्याने तर तिमाहीत निकालात १० टक्क्याने वाढ झाल्याचे देखील या अहवालात नमूद केले गेले आहे.

अहवालाच्या अंतिम निरीक्षणाप्रमाणे, स्थिर राहिलेल्या कॉटनच्या किंमती, परकीय चलनाचे समाधानकारक दर, व दैनंदिन कामकाजात वाढलेली उत्पादकता (Operational Efficiency) वाढल्याने हा सकारात्मक बदल टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये अपेक्षित आहे.
Comments
Add Comment

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Sanchita Suicide Case : संचिता उगले आत्महत्या प्रकरणात आता नव्हे वळण ; मैत्रिणीने सांगितलं एक नवीन सत्य

मुंबई : टीव्हीविश्वात निवडक भूमिका केलेल्या २२ वर्षांच्या संचिता उगलेने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी

Malnourished children : तीव्र कुपोषित बालकांचा घसरला आलेख

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश पालघर: कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचे