Sanchita Suicide Case : संचिता उगले आत्महत्या प्रकरणात आता नव्हे वळण ; मैत्रिणीने सांगितलं एक नवीन सत्य

मुंबई : टीव्हीविश्वात निवडक भूमिका केलेल्या २२ वर्षांच्या संचिता उगलेने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टी सुन्न झाली आहे. संचिताच्या वडिलांनी तर कोणावर आमचा संशय नाही असे आधीच सांगितले होते. नंतर संचिताचा को-स्टार उज्ज्वल शर्मा याने समोर येऊन संचिताच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेक दावे केले. पण आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. संचिताची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री इंद्राक्षी कांजीलाल हिने समोर येत उज्ज्वलचा खरा चेहरा समोर आणला.



काय सांगितलं इंद्राक्षीने ?
इंद्राक्षीने सांगितले कि उज्ज्वल शर्माचे सगळे दावे हे खोटे आहेत. खरं तर उज्ज्वलच संचिताचा मानसिक छळ करून तिला त्रास द्यायचा याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. साजन घर' या शोमध्ये काम करत असताना उज्ज्वलने संचिताकडून मोठी रक्कम उधार घेतली होती. जेव्हा संचिताने तिचे हक्काचे पैसे परत मागितले, तेव्हा उज्ज्वल तिच्यावर प्रचंड भडकला. त्याने सेटवर आणि फोनवर संचिताचा अपमान केला. इतकेच नाही, धमकी सुद्धा दिली होती.



इंद्राक्षी खरं बोलते कि खोटें ?
इंद्राक्षीने सांगितल्या प्रमाणे तिच्या कडे त्या दोघांचे व्हाट्सअप चॅट्स आहेत ज्यात स्पष्ट दिसतंय कि उज्ज्वल शर्मा संचिताशी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने बोलत आहे. 'साजन घर' या मालिकेच्या सेटवर उज्ज्वल संचिताचा सर्वांसमोर अपमान करायचा. या त्रासाला कंटाळून संचिताने प्रॉडक्शन हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रारही केली होती. मात्र, तिथून तिला कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. अखेर संचिताने तो शो सोडला. इंद्राक्षीचं ठाम म्हणणं आहे कि उज्ज्वल हा फक्त स्वतःच्या बचावासाठी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि एक्स बॉयफ्रेंडबद्दल खोट्या गोष्टी सोशल मीडिया वर पसरवतोय. आता या नव्या खुलाशानंतर आचोळे पोलीस उज्ज्वल शर्माचीही चौकशी करणार आहेत.

Comments
Add Comment

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या

Upcoming Reality Shows : सलमान - माधुरीसह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणखी ३ कलाकारांचा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून कमबॅक

मुंबई : १९६५ ते १९७० या काळात जन्मलेल्या ‘झेन एक्स’ पिढीतील अनेक सेलिब्रिटींनी ‘मिलेनियल्स’चे चित्रपट, मालिका

Samadhan Sarvankar : 'बेबी सरवणकर'चे आगमन! तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर झाले आई-बाबा

मुंबई : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे