Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात

मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने मुंबईतील पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, उपलब्ध जलसाठा जास्त काळ टिकवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. १५ मेपासून लागू असलेल्या १० टक्के पाणी कपातीनंतर आता १७ जूनपासून जलतरण तलाव, बांधकाम प्रकल्प आणि औद्योगिक-व्यावसायिक वापरावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १,५५,१६७ दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक असून तो एकूण क्षमतेच्या सुमारे १०.७२ टक्के आहे. हा साठा अंदाजे ४० दिवस पुरेल इतकाच असल्याने महापालिकेने जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार अतिरिक्त पाणीबचत उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या नव्या आदेशानुसार सर्व बांधकाम प्रकल्पांसाठी देण्यात आलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडित करण्यात येणार असून नवीन बांधकामांना पाणी जोडणी मंजूर केली जाणार नाही. तसेच शहरातील सर्व जलतरण तलावांच्या जलजोडण्या तात्पुरत्या बंद करण्यात येणार आहेत. औद्योगिक, व्यापारी आणि स्पोर्ट्स क्लब आस्थापनांच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात लागू करण्यात आली आहे.
याशिवाय एरेटेड वॉटर व पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर बॉटलिंग प्रकल्पांना दिला जाणारा पाणीपुरवठा केवळ कामगारांच्या पिण्याच्या गरजेपुरता मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाढीव किंवा अतिरिक्त जलजोडणीसाठी येणारे अर्ज पुरेसा जलसाठा उपलब्ध होईपर्यंत प्रलंबित ठेवले जाणार आहेत.

मुंबईला दररोज सुमारे ३,९५० ते ४,१०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता असते. पावसाचा विलंब आणि तलावांतील घटता साठा लक्षात घेऊन महापालिकेने आधीच १० टक्के कपात लागू केली आहे. सध्या तानसा पाणलोट क्षेत्रात केवळ १३ मिमी, तर मोडक सागर परिसरात ७ मिमी पावसाची नोंद झाली असून इतर तलाव क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही.सार्वजनिक स्वच्छतागृहे, प्रसाधनगृहे, वाहन धुणे, उद्यानांना पाणी देणे आणि रस्ते धुणे यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी टँकर, बोअरवेल किंवा विहिरींच्या पाण्याचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, एसीएफ, एचपीसीएल, बीपीसीएल, नेव्ही, एमआयडीसी आणि बीपीटी यांसारख्या संस्थांना दुय्यम वापरासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांमधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर बंधनकारक करण्यात आला आहे.दरम्यान, महापालिकेने स्पष्ट केले की यंदाचा जलसाठा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तलावांमध्ये केवळ ५.४५ टक्के पाणी उपलब्ध होते. मात्र, मान्सून आणखी लांबल्यास जलसाठा जुलैअखेरपर्यंत टिकवण्याचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान