Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती

मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली करून त्यांची नियुक्ती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ आयएएस अधिकारी प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.१५ सप्टेंबर २०२३ रोजी अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झालेल्या डॉ. जोशी यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास काही महिने बाकी असतानाच त्यांची बदली करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महापालिका आयुक्तपदी आश्विनी भिडे यांची नियुक्ती झाल्यानंतर जोशी यांच्या बदलीची शक्यता व्यक्त केली जात होती.
महापालिकेतील कार्यकाळात डॉ. जोशी यांनी मालमत्ता कर वसुलीत विक्रमी कामगिरी केली. तसेच अतिक्रमण आणि फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला गती देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आरोग्य विभागातील त्यांच्या पूर्वीच्या कामगिरीलाही विशेष दाद मिळाली होती.



दरम्यान, पावसाळ्याच्या तोंडावर शहराच्या आपत्कालीन व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीची सखोल माहिती असलेल्या डॉ. जोशी यांच्या बदलीमुळे प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.नवीन अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा या २००१ च्या आयएएस तुकडीतील अधिकारी असून त्यांना विविध प्रशासकीय पदांचा अनुभव आहे. त्यांचे वडील मुंबई महापालिकेच्या सेवेत कार्यरत होते, तर आई परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. मात्र मुंबई महापालिकेच्या व्यापक कामकाजाची माहिती घेण्यासाठी त्यांना काही कालावधी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार