शालेय निधी व्यवहारात गैरप्रकार आढळ्यास कारवाई होणार, पालकमंत्री उदय सामंत यांचा आदेश...

रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. शिक्षण क्षेत्रातील काही अधिकाऱ्यांना उदय सामंतानी चांगलंच धारेवर धरलं. जिल्हातील 5 हजार 830 शिक्षकांपैकी किती शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम राबवले आहेत ? पंतप्रधान अंतर्गत निधीतून काय काम केली ? विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी कोणते उपक्रम राबवले आहेत ? यांसारखे अनेक प्रश्न विचारुन उदय सामंत यांनी शिक्षकांची चांगली शाळा घेतली.

तसेच उदय सामंत यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला, रत्नागिरी येथील वाडा याठिकाणी शिक्षकांने विश्रांतीगृह सुरु केले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला झोप आली. तर वडिलांप्रमाणे विद्यार्थ्याला झोपवलं जातं विद्यार्थी झोपेतून जागा झाल्यानंतर पुन्हा शिकवलं जातं. सामाजिक कार्य म्हणून 365 दिवस विद्यार्थ्यांना  शिकवण्याचं काम शिक्षक करत असतात. तसेच काही शिक्षक विद्यार्थ्यांना बागेत खेळता यावं यासाठी बाग तयार करतात.काही शाळेतील विद्यार्थी इंग्रजी आणि मराठी एकाच वेळी लिहितात. अशा शिक्षकांचं मार्गदर्शन ठेवायला हव, अशी सुचना उदय सामंत यांनी केली...

तसेच उदय सामंत यांनी पंतप्रधान योजने अंतर्गत खर्च करण्यात आलेल्या शाळांना अहवाल देखील मागवला. यामध्ये काही गैरप्रकार आढळला तर त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

शालेय पोषणा संदर्भात अँप तयार करण्यात यावे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यात यावी. ज्या शाळेत पटसंख्या वाढवलेली आहे. त्या शाळेची माहिती गावागावत जाऊन सांगावी. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
Comments
Add Comment

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' संकेतस्थळावर जाणून घ्या अधिक माहिती

पुणे: शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन

आधी उड्डाणपूल अन् आता मेट्रो, सिंहगड रस्त्यावर पुणेकरांचा पुन्हा होणार खोळंबा!

पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ११८ कोटी रुपये खर्च करून

निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला, MPSC परीक्षेवर होणार परिणाम?

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा म्हणजे नगरपालिका आणि

'पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा'

पुणे : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा

कोणी परदेशातून, कोणी घोड्यावरुन, कोणी गब्बरसिंहच्या वेशात आलं पण मतदान करुन गेलं, नवरदेवानं लग्नाआधी मतदान केलं

मुंबई : राज्यातल्या २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले. लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगले सकारात्मक

निवडणूक रणधुमाळीमध्ये बुलढाण्यात गोंधळ; बोगस मतदाराला नागरिकांकडून चोप

बुलढाणा : राज्यात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात एक बोगस मतदार