Kolhapur : करुळ घाटात दरड कोसळली, सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्ग ठप्प

जिल्ह्यात ७ बंधारे पाण्याखाली


कोल्हापूर : जिल्ह्यात ७ तालुक्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे. दरम्यान, कोल्हापूर गगनबावडा मार्गावर करुळ घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असून पावसामुळे आज, सोमवारी सकाळी करूळ घाटात दरड कोसळली. मातीचा मलबा आणि दरड रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. २ तासांपासून घाटातील वाहतूक खोळंबली आहे. सध्या महामार्ग प्राधिकरणाकडून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली असून, घाटातील प्रवाशांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस


जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने पाटबंधारे विभागाने राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला आहे. सध्या प्रति सेंकद २५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने ‘भोगावती’, ‘पंचगंगा’ काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सात बंधारे पाण्याखाली


दरम्यान, २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १६.४ मिलिमीटर पाऊस झाला. गडहिंग्लज, आजरा, कागल, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी, दूधगंगा, कासारी, घटप्रभा, तुळशी धरणातून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे ‘भोगावती’ व पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे. सद्या जिल्ह्यात सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.


'यलो अलर्ट'


आज, सोमवारपासून दोन दिवस जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' हवामान विभागाने दिला आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

ही ०७ बंधारे पाण्याखाली

  • रुई - ४३ फूट १० इंच (इशारा ६७ फूट, धोका ७० फूट)

  • इचलकरंजी - ३५ फूट ९ इंच (इशारा ६८ फूट, धोका ७१ फूट)

  • तेरवाड - ३३ फूट ०५ इंच (इशारा ७१ फूट, धोका ७३ फूट)

  • शिरोळ - २८ फूट ०८ इंच (इशारा ७४ फूट, धोका ७८ फूट)

  • नृसिंहवाडी - २४ फूट ०२ इंच (इशारा ६५ फूट, धोका ६८ फूट)

Comments
Add Comment

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत