धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय विद्यार्थ्याने केवळ शिक्षक आणि पालकांच्या भीतीने स्वतःच्या अपहरणाचा ड्रामा रचला. हा प्रकार उघडकीस येताच चर्चेला उधाण आले आहे.


भंडारा मधील पवनी शहरालगत असलेली आनंदम विद्यामंदिर शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. नंतर भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात एका १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने टेबलवर काहीतरी अभद्र वाक्य लिहिली. शिक्षकांनी ती वाचताच पालकांना बोलवण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर मात्र विद्यार्थ्याला धडकी भरली. यावर मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्याने 'एआय'ला काय करायचे असे विचारले असता 'एआय'ने त्याला चुकीची कबुली देण्यास सांगितले. मात्र आपण चूक कबूल केली तर बाबा मारतील या भीतीने या अल्पवयीन विद्यार्थ्याने दुसरा मार्ग शोधला. त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. विद्यार्थ्याने भीतीपोटी अपहरणाचा असा बनाव रचल्याचे उघड होताच पालकही चकित झाले.



असा केला अपहरणाचा बनाव :


"१२ वर्षाचा एक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी स्कूल बसची वाट पाहत उभा होता. तोच एका व्यक्तीने तिथे येऊन त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि चाकूच्या धाकावर त्या विद्यार्थ्याचे अपहरण केले. ट्रॅव्हल्समधून उतरलेल्या एका व्यक्तीने या विद्यार्थ्याच्या नाकावर रुमाल ठेवताच तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला नागपूरच्या दिशेने नेत असताना उमरेडच्या पुढे त्याच्या परिचित असलेल्या एका मंदिराजवळ गाडी थांबताच त्याला अचानक शुद्ध आली, त्याने आरडाओरडा करताच अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांने घरी आईला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. थोड्याच वेळात जवळच राहत असलेले त्याचे मामा तेथे पोहोचले आणि ते त्याला सुखरूप घरी घेऊन आले. "


पालकांनी त्याला याबाबत आणखीन विचारणा करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले मात्र त्यात असे काहीही घडल्याचे निष्पन्न झाले नाही त्यामुळे पालकांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. विद्यार्थ्याला याबाबत आणखी प्रश्न विचारून त्याच्याकडून सत्य वदविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्याचा खोटेपणा फार काळ टिकू शकला नाही. व त्याने ढसाढसा रडत रडत आपण अपहरणाचा बनाव रचला असल्याचे पोलिसांसमोर कबूल केले.

Comments
Add Comment

Mumbai Goa Highway News : गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना वेग; ३१ ऑगस्टपर्यंत चार उड्डाणपुलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि कोंडीमुक्त

Maharashtra Police : राज्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड

मुंबई : पोलीस, कारागृह आणि नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या

Sunetra Pawar : चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.