विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार - प्रताप सरनाईक

मुंबई : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.


मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जून पासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६% इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या " पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर " योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत.


आता विद्यार्थ्यांना पास साठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्या कडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.


या संदर्भात १६ जून पासुन एसटी प्रशासनातर्फे "एसटी पास थेट तुमच्या शाळेत" ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.


या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

Comments
Add Comment

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या