Palki Sohala : देहू-आळंदीत वारीच्या सोहळ्याची लगबग सुरु!

  99

बुधवारी तुकोबा, गुरुवारी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान


पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील वारकऱ्यांना ओढ लागते पंढरपूरच्या वारीची. हाच आषाढी वारीचा प्रस्थान सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलाय. बुधवारी म्हणजे १८ जून २०२५ रोजी जगतगुरूश्री संत तुकाराम महाराजांचा, तर गुरुवारी, १९ जून २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी देहू आणि आळंदी इथं सुरू आहे.


?si=SgewN4uw26kEPb8N


आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी येत असतात. या दिंडीतील वारकऱ्यां पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा, थांबण्यासाठी तंबूची व्यवस्था प्रशासनानं केली आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यंदा देहूचे पालखी सोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे म्हणाले, 'पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ, अब्दागिरी यांना पॉलिश करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात रथापुढे २७ आणि रथामागे ३९० दिंड्या चालणार आहेत.




संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं वेळापत्रक



  • १८ जून रोजी देहूतील प्रस्थान होॅइल. इनामदार वाड्यात मुक्काम

  • १९ जून रोजी देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम

  • २० जून रोजी आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम

  • २१ जून रोजी पुण्यातील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम

  • २२ जून रोजी पुण्यातील हडपसर येथून प्रस्थान. लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम

  • दि. २२ रोजी लोणी काळभोर, दि. २३ यवत तसेच पुढे वरवंड, उडंवडी गवळ्याची, बारामती, सणसर, निमगाव केतकी,

  • इंदापूर, सराटी, अकलुज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी असं करत शनिवार, दि. ५ जुलै रोजी पालखी पंढरपूमध्ये

  • दाखल होईल. ६ तारखेला आषाढी एकदशीला चंद्रभागा स्नान आणि पांडुरंग दर्शन होईल.



संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळ्याचं वेळापत्रक



  • १९ जून रोजी आळंदी येथून माऊली पालखी प्रस्थान आळंदी

  • २० जून रोजी आळंदी ते पुणे प्रवास.

  • दि. २१ रोजी पुण्यात मुक्काम अलोक संविदारी सासवडला मुक्काम, सोमवारीही पालखी सासवडमध्येच असेल,

  • मंगळवार, दि. २४ रोजी जेजुरीमध्ये असेल.

  • पुढे वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी असं करत ५ जुलै २०२५ रोजी पालखी पंढरपूरमध्ये पोहचेल.

  • ६ तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात नगरप्रदक्षिणा आणि श्रीचे चंद्रभागा स्नान होईल.

  • पुढे १० जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच असेल. ​

Comments
Add Comment

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या