Stock Market Update: मार्केट क्रॅश सेन्सेक्स १००० व निफ्टी २९१ अंशाने घसरला! VIX Volatility Index ८.३४% उसळला 'ही' आहेत कारणे!

प्रतिनिधी: आज सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच बाजारात जोरदार घसरण झाली आहे.सेन्सेक्स (Sensex) निर्देशांक १०००.०० अंशाने घसरत ८०७३५.९५ पातळीवर व निफ्टी ५० (Nifty 50) २९१.७० अंशाने घसरत २४५९६.५० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स तब्बल १.०७% व निफ्टी १.०४% घसरले आहे. बाजार कोलमडल्याने सेन्सेक्स बँक निर्देशांक ७१९.८८ पातळीने तर बँक निफ्टी ६४५.५५ अंशाने घसरला आहे. यामुळे सकाळच्या सत्रात हाहाकार पहायला मिळत आहे.


सकाळी गिफ्ट निफ्टी (१.३८%) कोलमडल्याने बाजाराची सुरुवात वाईट झाली आहे.परिणामी सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅप दोन्हींमध्ये १.०५% घसरण झाली आहे तर निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९७% व ०.९२% घसरण झाली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील संकटाची परिस्थिती उद्भवल्यानंतर फटा भारतालाही बसला. इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्याने मध्यपूर्वेतील दबाव वाढला आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय हा हल्ला केला गेला आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान नित्यनाहू यांनी ही माहिती दिली. यामुळेच कच्च्या तेलाच्या (Crude Oil) मध्ये प्रचंड वाढ झाली आहे.ब्रेंट फ्युचर (Brent Future Index) पातळी ६.३२ टक्क्याने तर डब्लूटीआय फ्युचर निर्देशांक (WTI Future Index) मध्ये तर ९.८५% वाढल्याने तेलाचे भाव गगनाला भिडले जाण्याची शक्यता आहे.


याशिवाय अमेरिकन बाजारातील महागाई निर्देशांकदेखील डाऊ जोन्स मध्ये दिलेल्या अहवालाच्या तुलनेत ०.२% कमी राहिल्याने अमेरिकन बाजारात सकारात्मक संकेत मिळाले होते. एप्रिल महिन्यातील तुलनेत मे महिन्यात महागाई निर्देशांकात केवळ ०.१% वाढ झाली होती. मात्र चीन व अमेरिका यांच्यातील अंतिम बोलणीलाही विलंब झालेला असल्याने तसेच इस्त्राईलने इराणवर केलेल्या हल्ल्याने अमेरिकन बाजारात आता मोठा फटका बसला आहे. एस अँड पी ५०० (S&P 500 Future) तर १.६% अंकाने तर डाओ जोन्स (Dow Jones) १.४% कोसळला होता.त्याची परिणती भारतीय बाजारात आता होत आहे.


सकाळी निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्येही धूळधाण उडाली आहे.भारतीय अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) तर ८.३४% उसळला आहे.आज सकाळी सर्वाधिक नुकसान तेल व गॅस (१.३८%), कंज्युमर ड्युरेबल्स (१.२६%), मिडस्मॉलकॅप आयटी टेलिकॉम (१.१३%), हेल्थकेअर (०.६५%), पीएसयु बँक (१.४१%),मिडिया (०.९६%), आयटी (०.८६%) निर्देशांकात झाला आहे. तर वाढ तर कुठल्याही प्रकारच्या समभागात (Shares)मध्ये झाली नाही.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ भारत डायनॅमिक्स (२.८७%),ऑइल इंडिया (२.५%),एमसीएक्स (१.६६%),हिंदुस्थान एरोनॉटिक्स (१.०६%),ओएनजीसी (१.४७%),डेटा पॅटर्न (१.०६%), वेदांता (०.२१%) समभागात झाली आहे.तर सर्वाधिक घसरण कॅनरा बँक (३.९७%),इंटरग्लोब एव्हिएशन (३.८७%),टाटा टेलीकम्युनिकेशन्स (३.८४%),इंद्रप्रस्थ गॅस (३.८५%),क्रिसील (३.०९%),महानगर गॅस (२.०५%),पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (२.८०%),युनायटेड स्पिरीट (२.४०%),कोटक महिंद्रा बँक (२.१६%),अदानी पोर्टस (१.९०%),बजाज ऑटो (१.६९%),चोलामंडलम फायनान्स (१.६७%) या समभागात झाली आहे.

Comments
Add Comment

शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर : काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. आता

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात मुंबई : महापालिका निवडणुकीचा

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत