सिंधुदुर्गात १५ जूनला पावसाचा रेड अलर्ट

कणकवली तालुक्यात एकाचा वाहून गेल्याने मृत्यू


सिंधुदुर्ग: जिल्ह्यात गुरुवार पासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला आज आणि रविवारी १५ जूनला रेड अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ७१ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात देवगड तालुक्यात सर्वाधिक १६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.


मुसळधार पावसामुळे ओढे, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कणकवली तालुक्यात तालुक्‍यातील कळसुली लिंगेश्‍वर गवसेवाडी येथील महेश दिनकर देसाई (५२) हे ओढ्यात वाहून गेले. ही घटना काल १२ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. रात्री शोधाशोध मोहीम राबविण्यात आली.


यात मध्यरात्री एक वाजता त्‍यांचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला होता. यात ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी होते. हा ओढा पार करून घरी जात असताना ते वाहून गेल्‍याची शक्‍यता स्थानिकांनी व्यक्‍त केली आहे. वेंगुर्ले तालुक्यात परुळे येथे एका घरावर झाड पडून मोठं नुकसान झालं आहे.

Comments
Add Comment

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या