निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांची गैरसोय होऊ देऊ नका

आ. खताळ यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना


संगमनेर : संत निवृतीनाथ महाराजांच्या पालखी मार्गाच्या कामाची तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहाणी आमदार अमोल खताळ यांनी केली. या पालखीतील वारकरी बंधू आणि भगिनींची कोणतीही अडचण होणार नाही याची सर्व विभागाच्या अधिकार्यानी काळजी घ्यावी आणि त्याबाबतचे सुयोग्य नियोजन करावे अशा सक्त सूचना आ. अमोल खताळ यांनी दिल्या.


आषाढी वारीच्या निमिताने दरवर्षी संत निवृतीनाथ महाराज देवस्थानची पालखी पंढरपूरला जाताना तालुक्यातील पारेगाव बु।। येथे मुक्कामाला थांबते. गेली अनेक वर्षाची ही परंपरा असून तालुक्यातील भाविकांच्या वतीने या पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात येत असते. मागील वर्षी पावसाने वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. त्यामुळे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी मार्ग कामाबाबत जिल्हाधिकारी तसेच अन्य विभागांच्या अधिकार्यांना गांभिर्याने नियोजन करून पालखी येण्यापुर्वीच सर्व व्यवस्था निर्माण करण्या बाबतच्या सूचना दिल्या होत्या.आ.अमोल खताळ यांनी पारेगाव बु।। येथे येवून ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ अधिकारी यांची एकत्रित बैठक घेवून तयारीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच वारकर्यांसाठी तीन वाॅटरफ्रूफ मंडपाची उभारणी करण्यात येणार असून यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे महायुती सरकारने मंडपासाठी पाच लाख रूपये, २लाख ग्रामपंचायती करीता अनुदान तसेच २५० शौचालय आणि स्नानगृहा करीता २०० युनिट उभारणीसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली असल्याचे आ.खताळ यांनी सांगितले.


आरोग्य सेवेबाबत तात्पुरत्या स्वरुपातील दवाखाने सर्व यंत्रणांनी सज्ज ठेवावेत. पिण्याचे पाणी,तसेच वीज पुवरठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्याबाबत आ.खताळ यांनी सांगितले.मंडप उभार ण्यात येणार्या जागांची तसेच पालखी मार्गावर झालेल्या कामाची माहीती आ.खताळ यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता शाम मिसाळ यांच्या कडून जाणून घेतली.या रस्त्याच्या कामाकरीता मंत्री विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मार्गाचे काम होवू शकले.


उरलेल्या दिवसात साईडपट्ट्यांची काम पूर्ण करण्याच्या सूचना आ.खताळ यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी आ.अमोल खताळ यांच्या समवेत तहसीलदार धीरज मांजरे, अतिरीक्त गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता शाम मिसाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, तालुक्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, ॲड. त्र्यंबक गडाख, गणेश गडाख, रावसाहेव गडाख, लक्ष्मण गडाख, सुरेश दळवी, सुखदेव गडाख, भीमराज गडाख, नवनाथ गडाख, निलेश गडाख, कैलास गोर्डे, सुनील वाकचौरे, तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे, भाजप युवा नेते अमोल दिघे, भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष कविता पाटील l, संपत फड, अर्जुन शिरसाठ, डॉ. स्वाती डांगे, ग्रामसेवक गौरव कदम यांच्यासह पारेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संगमनेर तालुक्यात संत निवृतीनाथ महाराज देवस्थानची पालखी संगमनेर तालुक्यात येणे हा अहील्यानगर जिल्ह्या साठी मोठा अभिमान आहे. त्यामुळे या पालखीचे स्वागत चांगल्या पध्दतीने व्हावे म्हणून यंदा ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या समन्वयातून चांगले नियोजन झाले आहे. पालखीच्या स्वागतासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली असून जिल्ह्यातील सर्व वरीष्ठ अधिकारी वारकरी सांप्रदायातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. अमोल खताळ यांनी केले आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद