जागतिक मत्स्य उत्पादन क्षेत्रात भारताचा जगात दुसरा क्रमांक !

देशाच्या वाढीव मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान


मुंबई : भारतातील अन्न उत्पादनातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणून मत्स्य उत्पादन क्षेत्राकडे पहिले जाते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांत देशातील मत्स्य उत्पादन क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा सुमारे ८ टक्के असून, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासे उत्पादक देश बनला आहे. देशाच्या मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान असून राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्यातील मत्स्यव्यवसायाला अधिक चालना मिळत आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या काळात देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य उत्पादन क्षेत्राचे महत्वाचे योगदान आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला बळकटी मिळाल्याने जागतिक मत्स्यपालनात भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने तब्बल ६०,५२३.८९ कोटी रुपयांचे १७,८१,६०२ मेट्रिक टन (MT) सीफूड निर्यात केले आहेत. यामुळे भारताच्या निर्यात क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.




मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचे भरीव योगदान


देशाच्या मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री श्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक गती मिळत असून राज्यातील मत्स्योत्पादनामध्ये भरीव वाढ झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे सागरी मत्स्योत्पादन ४३४५७४ मे. टन इतके होते. सन २०२४-२५ मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकाळात राज्याच्या सागरी मत्स्योत्पादनामध्ये २९१८४ मे.टन ने वाढ झाली असून राज्याचे एकूण मत्स्योत्पादन ४६३७५८ मे. टन इतके झालेले आहे.


महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ (सुधारणा-२०२१) अंतर्गत होत असलेली प्रभावी अंमलबजावणी तसेच ड्रोनद्वारे होणारी देखरेख यामुळे राज्यातील अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सागरी मासेमारी संबंधी सर्वच उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून भविष्यात राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक बळकट होणार आहे.

Comments
Add Comment

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या