मुंबईतील सर्व लोकल एसी होणार? भाडेवाढ नाही, पण कधी?

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी! आता मुंबई लोकलचे सर्व डबे एसी होणार असून, विशेष म्हणजे त्यासाठी भाडेवाढ केली जाणार नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 'सेवा आणि सुशासनाचे अकरा वर्षे' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुंब्रा येथे नुकतीच घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. काही माध्यमांनी रेल्वेमंत्र्यांवर असंवेदनशीलतेचा आरोप केला, मात्र त्यांनी स्वतः माझ्याशी पाऊण तास चर्चा करून समस्या आणि उपाययोजना सांगितल्या आहेत. "एसी ट्रेन देण्याचा आणि तेही भाडं न वाढवता देण्याचा एक मास्टर प्लॅन सरकारकडे आहे," असे फडणवीस म्हणाले.



गर्दीचा प्रश्न आणि सरकारी उपाययोजना


मेट्रोचे जाळे पूर्ण नसतानाही लोकलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन सरकार काही उपाययोजना करत आहे. रेल्वे गाड्यांना दरवाजे बसवण्याचे काम सुरू आहे, ज्यामुळे सुरक्षा वाढेल. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, लोकांना हवा खेळती राहावी यासाठी सरकार उपाययोजना करेल. "लोकल गाड्यांमध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल, हे सरकारला कळतं. तेवढं डिझाइन डोकं सरकारकडे आहे," असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.


मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, एसी ट्रेन देणार पण भाडे वाढवणार नाही. वाढती गर्दी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुधारण्यावर सरकारचा भर आहे. तसेच, सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करून गर्दी कमी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.



काय आहे ही योजना?


मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकल ट्रेन मंजूर करण्यात आल्या आहेत. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा असतील:




  • स्वयंचलित दरवाजे: यामुळे सुरक्षितता वाढेल.

  • चांगली व्हेंटिलेशन व्यवस्था: प्रवाशांना ताजी हवा मिळेल.

  • इंटरकनेक्टेड कोचेस: एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाता येईल.


सरकारचा मुख्य उद्देश हाच आहे की, भाडेवाढ न करता प्रवाशांना एसी प्रवासाची सुविधा मिळावी.



डिझाइनमधील महत्त्वाचे बदल:


या नवीन ट्रेनच्या डिझाइनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत:




  • दरवाजांमध्ये लूव्हर्स: यामुळे बंद दरवाजांमधूनही हवा खेळती राहील.

  • छतावर व्हेंटिलेशन युनिट्स: बाहेरून ताजी हवा आत खेचण्यासाठी ही युनिट्स मदत करतील.

  • कोचेसमध्ये व्हेस्टिब्यूल्स: यामुळे प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज आणि सुरक्षितपणे प्रवास करता येईल.


प्रवासाची वेळ कधीपासून?


या योजनेनुसार, नोव्हेंबर २०२५ पर्यंत पहिली एसी ट्रेन तयार होईल आणि जानेवारी २०२६ मध्ये चाचणीनंतर ती सेवेत दाखल होईल.


मुंबई लोकलचा एसी प्रवास आणि भाडेवाढ नसणे ही मुंबईकरांसाठी एक मोठी दिलासा देणारी बाब ठरू शकते. मात्र, प्रत्यक्षात हा 'मास्टर प्लॅन' कधी पूर्णत्वास येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन

प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार? एकाच तारखेसाठी सत्ताधारी आणि विरोधक आग्रही

मुंबई: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू

मुंबईच्या महापौर आरक्षणाची पाटी नव्याने?

चक्राकार पध्दतीने नव्हे तर नव्याने आरक्षण सोडली जाण्याची शक्यता मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या आगामी

दहिसरमधून उबाठाला व्हाईट वॉश करण्याची महायुतीला संधी

मुंबई (सचिन धानजी): दहिसर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक १मध्ये म्हात्रे आणि घोसाळकर यांच्याशिवाय कुणीच

आचारसंहिता लागू, विद्रुप झालेल्या मुंबईने घेतला मोकळा श्वास; तब्बल २ हजार १०३ जाहिरात फलक हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची

सुभाष सिंग ठाकूरला २२ डिसेंबरपर्यंत कोठडी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक गँगस्टार सुभाष सिंग ठाकूरला मीरा-भाईंदर, वसई-विरार मध्यवर्ती