Tuesday, June 17, 2025

अभिनेत्री जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा

अभिनेत्री जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा

मुंबई : नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून अनेक स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात. अशातच महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख याची बायको जिनिलियानेही आज(दि.१०) वटपौर्णिमा साजरी केली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.


जिनिलिया देशमुखने घरातच आणलेल्या वडाच्या रोपट्याची पूजा केली. देवघरासमोरच ही पूजा मांडली होती. जिनिलियाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता ज्यात ती सुंदर दिसत होती. 'प्रिय नवरा...आय लव्ह यू, बस... वटपौर्णिमा' असं तिने व्हिडिओ शेअर करत लिहिले.


 



 










View this post on Instagram























 

A post shared by IWMBuzz (@iwmbuzz)





जिनिलिया देशमुख कुटुंबात अगदी आनंदाने सर्व सण, रुढी परंपरा पाळताना दिसते. म्हणूनच तिला महाराष्ट्राची लाडकी वहिनीही म्हटलं जातं. रितेश आणि जिनिलियाच्या लग्नाला १३ वर्ष झाली आहेत. त्याआधी ते १० वर्ष एकमेकांना डेट करत होते. सर्वांसाठी दोघंही आदर्श कपल आहे. त्यांना राहील आणि रियान ही दोन मुलं आहेत.


जिनिलिया आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमात दिसणार आहे. आमिर खानसोबत तिची जोडी जमली आहे. त्यांची केमिस्ट्रीवर प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर दुसरीकडे रितेश देशमुख नुकताच 'हाऊसफुल ५' सिनेमात दिसला. सध्या तो 'राजा शिवाजी' सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. जिनिलिया सिनेमाची निर्मिती करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा