आगामी स्थािनक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा

आमदार निलेश राणे यांचे आवाहन


चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण यांच वेगळं नातं आहे, ते कधीच तुटू शकत नाही. गावातील लोकांना धनुष्यबाण माहित आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माहीत आहेत. यामुळे लोकं स्वतःहून शिवसेनेत येत आहेत.


शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून भेट द्यायची आहे, तेव्हा लोकांची कामे झाली पाहिजेत, या दृष्टीने काम करतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन कुडाळ-मालवणविधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना केले.


यावेळीच त्यांनी, तुम्ही कधीही मला हाक मारा, मी तुमच्यासोबत सदैव उभा राहिन, अशी ग्वाही देखील यावेळी दिली. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहर प्रमुख उमेश सकपाळ यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांचे स्वागत करीत सत्कार केला. यानंतर आ. निलेश राणे म्हणाले की, आपण कडवट शिवसैनिक, पदाधिकारी आहात. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन, अशी ग्वाही आमदार राणे यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो.


यामुळे शिवसेना पक्षाचे उपकार आयुष्यात कधीच विसरणार नाही, असे सांगताना चिपळूणमुळे आपल्याला ओळख मिळाली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवासेना तालुकप्रमुख निहार कोवळे, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रश्मी गोखले आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगरसेवकांची यादी समोर, जाणून घ्या सविस्तर

प्रभागानुसार उमेदवारांची यादी प्रभाग क्रमांक १ जागा क्रमांक अ (सर्वसाधारण स्त्री): खेडेकर वैभवी विजय (शिवसेना) =

खेड - मंडणगड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खेड : खेड–मंडणगड मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा

शिवसेना नेते रामदास कदम यांना मातृशोक

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाराम कदम यांचे वृद्धापकाळाने निधन

दीड वर्षांच्या जलतरणपटू 'वॉटर बेबी' वेदाने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड वर कोरलं नाव

रत्नागिरी : वय फक्त दीड वर्ष… आणि कामगिरी थेट राष्ट्रीय स्तरावर! रत्नागिरीच्या वेदा सरफरेने देशातील सर्वात लहान

मोबाईल नेटवर्कसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

रत्नागिरी : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी

मडगाव, रत्नागिरी, उडुपी या स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी

मुंबई : कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकात आणि कोकण रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वेगाड्यांमध्ये ‘५ जी’ नेटवर्क