गुहागरात युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार

आशिष कारेकर गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत समिती गणासाठी निवडणूक होत आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजप -शिवसेना हे युतीच्या माध्यमातून लढत आहेत. तर महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील एकत्र असल्याचे दिसून येत नाही.


महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी शरद पवार गट या निवडणुकीत फारसा सक्रिय नाही तर काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. तर उबाठा व मनसे हे एकत्र निवडणूक लढवत आहेत. यामध्ये देखील मनसे केवळ एका जागेवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे इतर सर्व ठिकाणी उबाठाने आपले उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी युती विरुद्ध उबाठा अशीच लढत होणार आहे.


यात असगोली जिल्हा परिषद गटात युतीकडून संतोष जैतापकर व उबाठाकडून आ. भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्यात टक्कर होणार आहे. शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून युतीकडून डॉ. राजेंद्र पवार व मनसेचे प्रमोद गांधी, कोंडकारूळ जिल्हा परिषद गटातून युतीकडून अपूर्वा बारगोडे व उबाठाकडून मानसी घाणेकर, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून युतीकडून नेत्रा ठाकूर व उबाठाकडून सिद्धी रामगडे, पडवे जिल्हा परिषद गटातून युतीकडून महेश नाटेकर व उबाठाकडून सचिन बाईत अशी लढत रंगणार आहे. पंचायत समितीचा विचार करता अंजनवेल पंचायत समिती गणातून उबाठाकडून प्राजक्ता जांभारकर व युतीकडून सारिका दाभोळकर, असगोली पंचायत समिती गणातून उबाठाकडून उर्वी खैर व युतीकडून पूनम रावणंग, तळवली पंचायत समिती गणातून उबाठाकडून संदीप धनावडे व युतीकडून मंगेश जोशी, शृंगारतळी पंचायत समिती गणातून उबाठाकडून संजय पवार व युतीकडून गौरव वेल्हाळ, मळण पंचायत समिती गणातून उबाठाकडून साक्षी चव्हाण व युतीकडून मानसी रांगळे, कोंडकारूळ पंचायत समिती गणातून उबाठाकडून महेश गोवळकर व युतीकडून प्रणव पोळेकर, वेळणेश्वर पंचायत समिती गणातून उबाठाकडून सचिन जाधव व युतीकडून संदीप गोरीवले, शीर पंचायत समिती गणातून उबाठाकडून ज्योत्स्ना काताळकर व युतीकडून स्नेहा शिगवण, पडवे पंचायत समिती गणातून उबाठाकडून रवींद्र आंबेकर व युतीकडून निलेश सुर्वे तर पाचेरी सडा पंचायत समिती गणातून उबाठाकडून शशिकला मोरे व युतीकडून सुचिता घाणेकर यांच्यात खरी लढत रंगणार आहे. त्यामुळे एकंदरीत गुहागरमधील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत समिती गणाचा विचार करता बहुतांश ठिकाणी युती विरुद्ध उबाठा अशीच लढत होणार आहे हे चित्र स्पष्ट आहे.

Comments
Add Comment

Ganpatipule Beach : पर्यटकांची प्रतीक्षा संपली! गणपतीपुळे समुद्रकिनारा खुला, प्रशासनाने दिला सर्तकतेचा इशारा

रत्नागिरी : महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेला गणपतीपुळेचा समुद्रकिनारा अखेर तब्बल 60

ST bus accident : रत्नागिरीत एसटी बसची मोटारीला धडक; तिघे जखमी

रत्नागिरी : केळवली फाटा (ता. राजापूर) येथील जामदे पुलाजवळ एसटी बसने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिल्याने

Vaibhavwadi-Kolhapur Railway : कोल्हापूर ते कोकण अवघ्या १ तास ३६ मिनिटांत! ७० वळणे, ११ स्थानके; वैभववाडी रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण

रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाबाबत

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे

Deorukh News : महावितरणच्या जाबाज कर्मचाऱ्यांना सलाम; काळ्याकुट्ट अंधारात आणि जंगलात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा केला पूर्ववत

देवरुख : मुसळधार पाऊस, काळाकुट्ट अंधार, घनदाट जंगल आणि हिंस्त्र वन्यप्राण्यांची भीती. या सगळ्यावर मात करत

Rajapur Ganga : साडेसात महिन्यांनंतर भर पावसात राजापूरची गंगा पुन्हा प्रवाहित; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

राजापूर : सुमारे साडेसात महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राजापूरची ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली