Saturday, June 7, 2025

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ८ जून ते १४ जून २०२५

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ८ जून ते १४ जून २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ८ जून ते १४ जून २०२५






















































हितशत्रूंवर मात कराल


मेष : सरकारी नोकरी करणाऱ्यांनी खूप सावध राहिले पाहिजे. त्यांच्या कार्यक्षेत्रात काही जर चूक झाली तर त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. या कालावधीमध्ये शत्रू तोंड वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या पदावर डाग लावण्याचा प्रयत्न ते करतील. तसेच ज्येष्ठ किंवा वडील यांच्याशी मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही स्वतः शांत राहा. त्यांच्या विचारांशी सहमत व्हा. म्हणजे वाद-विवाद वाढणार नाही. प्रकृतीवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. बाकी सर्व सारासार विचाराने प्रश्न आपले सोडवाल. विवाहित व्यक्तींना वैवाहिक सुख मिळेल. नवीन संधी येतील. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या.

विवाह योग


वृषभ : विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. प्रकृती स्वास्थ्य चांगले असेल. या कालावधीमध्ये हॉटेल रेस्टॉरंट यांचा व्यवसाय चांगला चालेल. त्यांना आर्थिक फायदा होईल. त्याचप्रमाणे संगीत, कला क्षेत्रातील लोकांना चांगल्या संधी येतील. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जावे लागेल. मित्रांबरोबर मनोरंजनासाठीही बाहेर जातील. राजनीती क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा कालावधी चांगला आहे. आपल्याला जर स्थावर मालमत्ता खरेदी करायची असेल तरी हा कालावधी चांगला आहे. नवीन संधी येतील. संधीचा फायदा घ्या. व्यापार-व्यवसायात नवनवीन ओळखी होतील. त्यांचा आपल्याला लाभ होईल.

बोलण्यावर नियंत्रण ठेवणे


मिथुन : आपल्या बहीण-भावात बरोबर वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपल्या बोलण्याने आपले सहकारी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या राहणीमानात उच्च बदल होणार आहेत. त्यासाठी जास्त खर्च होणार आहे आहे. गुंतवणूक करताना खूप विचारपूर्वक केली पाहिजे. शेअर मार्केट किंवा स्टॉकमध्ये करू नये. मित्र किंवा कुटुंबासमवेत बाहेर जाण्याचा, सहलीचा कार्यक्रम आखाल. मुलं आनंदात असतील. विद्यार्थ्यांना या कालावधीमध्ये चांगले यश मिळेल. विवाहित व्यक्तींना वैवाहिक सुख उत्तम मिळणार आहे.

नवीन संधी येतील


कर्क : जातकांना सावध राहणे आवश्यक आहे. कारण जे जातक स्टॉक मार्केटमध्ये काम करत आहेत त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त गुंतवणूक करू नये. घाईगर्दीत कुठलेही व्यवहार करू नका. महिला वर्गांनी खरेदीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा आर्थिक नियोजन गडगडण्याची शक्यता आहे. त्यावरून घरातील व्यक्तींशी वाद-विवाद होऊ शकतो. विवाहयोग्य मुलांसाठी चांगल्या घराण्यातून स्थळे येतील. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. त्यामुळे आपली वाटचाल चांगली होईल. नवीन संधी येतील.

सकारात्मक विचारांना प्राधान्य द्याल


सिंह : सकारात्मक विचारांना प्राधान्य द्याल. आपले लक्ष पुरे करण्यासाठी प्रयत्नशील राहाल, आपली तर स्वप्ने मोठी आहेतच पण त्या प्रमाणात आपली मेहनत कमी पडत होती. आता आपण जास्त मेहनत कराल व ध्येय प्राप्ती करून घ्याल. खासगी नोकरी करणाऱ्यांना सावध राहण्याचा इशारा आहे. सहकार्य वर्गाशी काही वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य व वैवाहिक सौख्य चांगल्या प्रकारे मिळणार आहे.

आर्थिक लाभ


कन्या : एखाद्या व्यवसायामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ होणार आहे. प्रगतिपथावर राहणार आहात. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल.संततीविषयी जे काही प्रश्न आणि चिंता होती त्यामध्ये मार्ग निघणार आहेत. आळसाचा त्याग करून आपण आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करणे अतिशय चांगले होईल. मित्र-मैत्रिणींची सोबत आपणास आनंदित व उत्साहित करेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांचे लक्ष अभ्यासात लागणार आहे.

कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी


तूळ : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपणास खूप काम वाढणार आहे. नवीन जबाबदारी पण आपणास देण्यात येणार आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढणार आहे. आपण आपले काम वेळेत पूर्ण कराल. त्यामुळे आपले वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. ते आपणावर खूश होणार आहेत. त्यातून आपल्याला परदेशात सहलीचे बक्षीस मिळू शकते. आपणास या प्रवासामध्ये आनंद मिळणार आहे. व्यापार-व्यवसायात आपल्या नवनवीन ओळखी होतील. त्यांचा आपल्याला लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या प्रकृतीसंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे.

कर्ज फिटेल


वृश्चिक : आपले आर्थिक लाभ चांगल्या प्रमाणात होणार आहेत. बरेच दिवस आपले कर्ज फिटत नव्हते ते कर्ज या कालावधीतमध्ये फिटून जाणार आहे. त्यामुळे आपल्याला मानसिक समाधान व शांतता मिळणार आहे. व्यापार व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या बहीण-भावांचा पूर्ण सहयोग मिळणार आहे. आपल्याला प्रगती करण्यास वाव मिळणार आहे. आपणास लहान-मोठ्या अडचणीही येऊ शकतात. तसेच मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, ही आव्हाने आपण सहज पार करू शकता.

नवीन आव्हाने स्वीकारा


धनु : आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ऊन सावलीची परिस्थिती निर्माण होणार आहे. आपली जवळची व्यक्ती आपल्या बदनामीला कारण होऊ शकते. याच कारणाने आपले वैवाहिक जीवन अस्थिर होऊ शकते. व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही आव्हाने समोर येण्याची शक्यता आहे. नवी मैत्री अचानक तुटू शकते. आपण आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये व्यस्त असणार आहेत. त्यामुळे व्यक्तिगत आयुष्याकडे कमी लक्ष दिले जाईल. मानसिक संतुलन नीट ठेवून निर्णय घ्या.

प्रलोभने टाळा


मकर : आपल्याला बेकायदेशीर मार्गातून धनप्राप्ती करण्याची इच्छा होऊ शकते किंवा काही गुप्तरितीने अर्थप्राप्ती करण्याचा योग आहेत. पण लक्षात ठेवा अशा रीतीने पैसे कमावल्यास काही हातात येणार नाही. आपल्या कर्तृत्वावरच आपण आपले धन कमवावे. प्रेमी-प्रेमिकांना काही आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, पण कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येईल. प्रेम प्रकरणात जोडीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नका. नोकरीमध्ये शुभ कालावधी आहे. व्यवसायामध्ये वृद्धी होईल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल.

यशाचे प्रमाण वाढेल


कुंभ : आपण ज्या गोष्टीत हात घालाल त्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे. जर आपल्याला कारखान्याचे पुनर्निर्माण करायचे काम राहून गेलेले असेल तर, ते या काळामध्ये पूर्ण कराल. नवीन वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मनाजोगत्या संस्थेमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा होती, त्या संस्थेत किंवा इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना ॲडमिशन मिळू शकते. मनातील ही इच्छा पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. त्यांना शुभ समाचार मिळू शकतात. स्कॉलरशिपही मिळू शकते. आपणास मित्र-मैत्रिणींचा सहयोग मिळेल. आपण आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये व्यस्त असणार आहेत.

जुनी येणी येतील


मीन : आपली आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. आर्थिक लाभही मोठ्या प्रमाणात होतील. न मिळणारे पैसे देखील आपणास मिळतील. आपण आपल्या जोडीदाराच्या नावे गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास ती जर स्थिर मालमत्ता केली तर ती फायदेशीर ठरेल. आपल्याला आपल्या जवळच्या मित्राकडून आर्थिक लाभ होऊ शकतात. आपल्या कुटुंबामध्ये सुख, शांती आणि सद्भावना यांचे वातावरण असेल. असे वातावरण ठेवण्यासाठी आपणच जबाबदार असाल. कुटुंबासाठी कर्तव्यपूर्ती करण्याचे समाधान लाभेल. कुटुंबातील जुने वादविवाद संपुष्टात येतील.
Comments
Add Comment