पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या पुलासाठी भिडे पूल आणखी दीड महिना बंद ठेवला जाणार आहे. महामेट्रोने मार्च महिन्यात या पुलाचे काम सुरू केले होते, तर दि. ६ जूनपर्यंत ते पूर्ण करून भिडेपूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता.

मात्र, प्रत्यक्षात या पादचारी पुलाचे काम केवळ २० टक्केच पूर्ण झाल्याने महामेट्रोने १५ ऑगस्टपर्यंत पूल बंद ठेवण्याची मागणी वाहतूक पोलीस तसेच महापालिकेकडे केली आहे.

शहराच्या पश्चिम उपनगरांमधील बहुतांश दुचाकी वाहतूक नदीपात्रातील रस्त्यावरून भिडे पुलावरून शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये येते. दररोज सुमारे अडीच ते तीन लाख दुचाकींची या रस्त्यावर वर्दळ असते. पावसाळ्यात केवळ मुठा नदीला पाणी सोडण्यात आल्यानंतरच हा रस्ता बंद केला जातो. मात्र, आता मेट्रोच्या पादचारी पुलासाठी भिडेपूल बंद करण्यात आला आहे.

या रस्त्यावरून येणारी दुचाकी वाहनांची वाहतूक डेक्कनवरून लकडी पुलामार्गे शहरात वळवण्यात आली आहे. तर, नदीपात्रात जाण्यासाठी अनेक वाहनचालक झेड ब्रीजचा वापरहोत आहे. मात्र, हे रस्ते मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दुचाकींसाठी कमी पडत असल्याने, या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
Comments
Add Comment

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी