गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी अतिरिक्त आरक्षण खिडक्या

  46

प्रवासी संघटनेने खा. नरेश म्हस्के यांचे मानले आभार


ठाणे: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के दिली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु होणार आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे. अतिरिक्त खिडक्या वाढवल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आभार मानले आहेत.

नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त लोखो कोकणवासिय ठाणे, मुंबई आणि उपनगरांत स्थायिक झाले आहेत. कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असू द्या गणपतीला दरवर्षी तो गावी जातोच. गणपतीसाठी बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र आरक्षण खिडक्यांची नगण्य संख्या आणि लांब रांग यामुळे कोकणवासीय मेटाकुटीला येतात. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेले ४ वर्ष लावून धरली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेने ही मागणी नरेश म्हस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही दिवसांतच हा प्रश्न मार्गी लागला आहे.

खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे ७ मे २०२५ रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला. या पत्राची तातडीने दखल घेत २ जून २०२५ रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे २ अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरु करत असल्याची माहिती दिली आहे. २० जून २०२५ ते ५ जुलै २०२५ या दरम्यान या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु राहणार आहेत. सध्या ४ आरक्षण खिडक्या कार्यरत असून २ अतिरिक्त खिडक्या सुरु होणार आहेत. ६ आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांची वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नसल्याने प्रवासी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment

अंधश्रद्धेतून महिलेचा खून, आरोपीस अटक

कळवा : कळवा स्टेशन जवळील सीमा हाईट्स या इमारती मध्ये मजुरीचे काम करणाऱ्या महिलेची हत्या करून, तिचे दागिने चोरून

ठाणे शहरात १०४ खेळांची मैदाने, मात्र खेळायला जागाच नाही

हक्काच्या मैदानांसाठी न्यायालयात दाद मागण्याचा सामाजिक संस्थांचा इशारा ठाणे : ठाण्यात क्रीडा संस्कृती रुजावी,

पालिकेची २ हजार ७०० कोटींची विकासकामे प्रगतिपथावर

भाईंदर :माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेली २ हजार ७०० कोटी रुपयांची

‘जुन्या ठाणे शहरातील रहिवाशांना तातडीने पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस जोडणी द्या’

महानगर गॅस अधिकाऱ्यांना खासदार नरेश म्हस्के यांची तंबी ठाणे  : ठाणे शहरातील नौपाडा, राम मारुती रोड, घंटाळी,

ठाण्यात बॅनरबाजीचा झगमगाट

माजी नगरसेवकांच्या प्रचारातून निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ठाणे : गेल्या साडेतीन वर्षांपासून ठाणे

जुन्या कंत्राटी सफाई कामगारांना सेवेत सामावून घ्या

अन्यथा ठेकेदाराला कल्याण-डोंबिवलीत फिरू न देण्याचा इशारा कल्याण  : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा