घोडबंदर रस्त्यावर सर्वंकष स्वच्छता मोहीम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापािलकेची मोहीम


ठाणे :ठाणे महानगरपालिकेने संपूर्ण घोडबंदर रस्त्यावर सर्वंकष स्वच्छता मोहीम हाती घेतली असून मुख्य रस्ता, सेवा रस्ता, दुभाजक, चौक अशा सर्व ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ही सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे.


त्यानुसार, ठाणे महापालिकेने घोडबंदर मार्गावर दुर्तफा सर्वंकष स्वच्छता मोहिम सुरु केली. कापूरबावडी ते पातलीपाडा, पातलीपाडा ते हायपर सिटी, हायपर सिटी ते नागला बंदर, नागला बंदर ते गायमुख अशा चार टप्प्याने विभाग करण्यात आले असून त्या प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकाऱ्यासोबत साहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेत मुख्य रस्ता, सेवा रस्ता, दुभाजक या ठिकाणावरील कचरा काढणे, राडारोडा उचलणे, दुभाजक स्वच्छ करणे, नाले आणि गटारातील गाळ उचलणे, झाडांच्या कापलेल्या फांद्या उचलणे अशी कामे करण्यात येत आहेत.


महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत, उद्यान विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रभाग समिती, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मेट्रो विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही मोहीमेत सहभाग घेतला. सुमारे ५०० सफाई कामगार, १५ डम्पर, सफाईची यंत्र यांच्या मदतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. उपायुक्त मनीष जोशी आणि दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि सुधीर गायकवाड यांच्यावर समन्वयाची जबाबदारी असून आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त सोनल काळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या विभागातील सर्वंकष स्वच्छता अभियानात सहभागी झाले.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे