Microsoft Job Lay off: जगभरात नोकऱ्या जाण्याचा धडाका सुरूच मायक्रोसॉफ्ट,डिजनीकडून शेकडोंची कर्मचारी कपात

भारतातील पुण्यात व हैद्राबाद शहरात आयटीतील कर्मचारी भरतीत मात्र वाढ

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा फटका आता टेक कंपन्यांनाही जाणवू लागला आहे. ज्याला मायक्रोसॉफ्ट व डिजनी सारख्या बड्या कंपन्यांही अपवाद नाहीत. ' ब्लुमबर्ग ' दिलेल्या वृत्तानुसार ३०० अतिरिक्त कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्टकडून ६००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला गेला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली आहे. त्याच परिस्थिती डिजनी कंपनी सामोरी जात आहे. वृत्तानुसार डिजनी कंपनीने देखील शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.

डिजनीकडून मार्केटिंग, पब्लिसिटी, कास्टिंग, फायनान्स अशा विविध विभागातून ही कार्यवाही केली आहे. मायक्रोसॉफ्टकडूनही कंपनीच्या विविध विभागांवर ही कार्यवाही केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला विराजमान यांनी देखील याची पुष्टी केली. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या बदलत्या कर्मचारी धोरणात्मक निर्णयानुसार कर्मचारी कपात ठरवण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

कंपनीकडून वेतनासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाची कपात म्हणून हे पाऊल उचलले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे २२४००० हून अधिक कर्मचारी आहेत. डिजनी कंपनीचे देखील २२३००० हून अधिक कर्मचारी अमेरिका व इतर ठिकाणी कार्यरत आहेत.

याचा सर्वात मोठा फटका कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी व आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर पडल्याचे पहायला मिळत आहे. नुकत्याच मिळालेल्या नोकरी जॉबस्पिक वरील अहवालानुसार, वर्षानुवर्षे बेसिसवर (Year on Year Basis) आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग क्षेत्रातील नोकरीच्या संधीत २५ टक्क्यांनी घट झाली आहे. या अहवालातील माहितीनुसार, या क्षेत्रात मे २०२४ मधील नोकरीच्या संधीत मे २०२५ पर्यंत ५ टक्क्यांनी कपात झाली आहे.

रिटेल, टेलिकॉम, बँकिंग, फायनान्स, ब्रोकिंग क्षेत्रातील कामगिरीत घट दिसून आली. या क्षेत्रातील संधीत ८ ते ९ टक्क्यांनी घट झाली आहे.भारतातील पुण्यात मात्र ४ टक्क्यांनी व हैद्राबाद कोची क्षेत्रात मात्र नोकरीच्या भरतीत वाढ झाल्याचे अहवालात सांगण्यात येत आहे. मात्र जागतिक बड्या कंपन्यांच्या कपातीचे वादळ जगभरात घोंघावत असताना होतकरू तरुणांच्या दृष्टीने ही आनंदाची बातमी नाही.
Comments
Add Comment

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

अरबाज खान झाला बाबा, पत्नी शुरा खानने दिला मुलीला जन्म

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना रविवारी मुलगी झाली. ५८ व्या वर्षी अरबाज

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या