सीमापार वाढत्या सायबर धोक्यांना बसणार आळा क्विक हीलचे विनामूल्य 'अँटीफ्रॉडडॉटएआय' फ्रीमियम मॉडेल

मुंबई: सीमापार येणाऱ्या सायबर धमक्यांचे प्रमाण वाढत असताना व नागरिकांच्या डिजिटल खाणाखुणाही वाढत्या प्रमाणात सर्वदूर पसरत असताना सायबरसुरक्षेच्या क्षेत्रातील भारतातील सर्वात विश्वासार्ह नाव असलेल्या क्विक हील टेक्नोलॉजिज लिमिटेडने अँटीफ्रॉडडॉटएआय या फसवणूकीला प्रतिबंध करणाऱ्या प्रमुख उपाययंत्रणेची फ्रीमियम आवृत्ती विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे.सायबर जगातील घडामोडी,विशेषत:गंभीर स्वरूप धारण करत असलेल्या इंडो-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा धाडसी व समयोचित निर्णय घेण्यात आला आहे,जिथे प्रत्यक्ष सीमारेषेइतकेच डिजिटल आघाडी सांभाळणेही अत्यंत महत्त्वाचे आहे.


AntiFraud.AI च्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ फोनवर दिसणारे घातक ॲप नव्हे तर लपलेले किंवा 'अदृश्य' ॲप शोधून काढण्याची अनोखी क्षमता,ज्यामुळे हे ॲप सायबरसुरक्षा क्षेत्रामध्ये वेगळे ठरते.ही छुपी ॲप बरेचदा यूजरच्या अपरोक्ष काम करत असतात. फिशिंग,स्पायवेअर व आर्थिक फसवणूकीच्या हल्ल्यांमध्ये त्यांचा वापर करून घेतला जातो. AntiFraud.AI यूजर्सना अशा प्रकारच्या ॲपचे अलर्ट्स पाठवते आणि त्यांना सुधारात्मक कृती करण्यास मदत करते ज्यामुळे हे प्रत्येक मोबाइल यूजरसाठी संरक्षणाचे एक अत्यावश्यक कवच बनले आहे. नागरिकांचे घोटाळे, स्पायवेअर्स आणि सायबर फसवणूकीपासून संरक्षण करण्याची तातडीची गरज ओळखून क्विक हीलने Freemium ऑफरिंगच्या रूपात ही उपाययोजना उपलब्ध केली आहे, ज्यातून अत्यावश्यक संरक्षक साधने विनामूल्य प्राप्त होतील याची खबरदारी घेतली गेली आहे जेणेकरून ग्राहकांना निर्भयपणे डिजिटल व्यवहार करण्याची हमी मिळावी. या सुविधेमध्ये घातक ॲप तसेच छुपे आणि उघड दोन्ही समोर आणण्यासाठी फ्रॉड ॲप डिटेक्टर,स्कॅमपासून संरक्षण, फ्रॉडचा धोका किती आहे हे जाणण्यासाठी रिस्क प्रोफाइस असेसमेंट, कॉल फॉरवर्डिंग अलर्ट, बँकिंग फ्रॉड अलर्ट, पेई नेम अनाऊन्सर, फ्रॉड प्रोटेक्ट बडी आणि अनऑथोराइज्ड ॲक्सेस अलर्ट इत्यादी सेवा सुविधांचा समावेश आहे.


याविषयावर प्रतिक्रिया देताना क्विक हील टेक्नोलॉजिज लिमिटेडचे सीईओ विशाल साळवी म्हणाले,'सायबर सुरक्षा हा सर्वांचा मुलभूत अधिकार आहे असे क्विक हीलमध्ये आम्हाला ठामपणे वाटते.सध्याच्या तणावपूर्ण काळात,जिथे डिजिटल धमक्यांमध्ये खऱ्याखुऱ्या जगातील संघर्षाचेच प्रतिबिंब दिसत आहे,तिथे देशाच्या सोबत उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. AntiFraud.AI ची फ्रीमियम आवृत्ती सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून देत आम्ही आमची राष्ट्रीय कटिबद्धता – म्हणजे सायबरगुन्हेगार व घोटाळेबाजांच्या नवनवी रूपे धारण करणाऱ्या क्लुप्त्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक नागरिकांची मदत करण्या प्रतीची आपली बांधिलकी नव्याने सिद्ध केली आहे.”


इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन (१४सी)ने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार सायबर घोटाळ्यांमुळे झालेले नुकसान १७५० कोटी रुपयांवर पोहोचलेले असताना हा उपक्रम भारताचे डिजिटल परिक्षेत्र सुरक्षित राखण्याच्या तातडीच्या गरजेशी सुसंगत आहे. २०२४ च्या सुरुवातीला नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर ७४०,००० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली.या निर्णायक वळणावर क्विक हीलने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्सना डिजिटल सुरक्षिततेतली त्रुटी भरून काढण्यास एक प्रकारे मदतच होऊ शकते असा कयास व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Nasik News: नामांकित शाळेत बॉम्ब असल्याचा धक्कादायक मेल, शाळा प्रशासनात खळबळ!

नाशिक: नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

मारुती सुझुकीने लाँच केली नवी SUV ‘व्हिक्टोरिस’; किंमत आणि दमदार फीचर्सची घोषणा!

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपली नवीन आणि बहुप्रतिक्षित एसयूव्ही

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष