महाराष्ट्र एटीएसची साकीब नाचणच्या घरावर धाड, पडघ्यात शोध मोहीम

ठाणे : महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे धाड टाकली आहे. निवडक घरांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. तसेच महाराष्ट्र एटीएसने अतिरेकी साकीब नाचणच्या घरावरही धाड टाकली आहे. साकीब हा बंदी असलेल्या स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या संघटनेचा पदाधिकारी आहे. साकीबला आधीच दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.

एटीएसने धाड टाकण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. पण शोध मोहीम सुरू असल्याचे तसेच काही साहित्य जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

मुंबईत २००२-२००३ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंडमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात साकीबला दोषी ठरवण्यात आले आहे. साकीब २०१७ मध्ये तुरुंगातून बाहेर आला. यानंतर तो पुन्हा अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप होत आहे. साकीब नाचणने तुरुंगातून बाहेर येताच पडघा येथे अज्ञात ठिकाणी AK47 रायफलसह अनेक संहारक शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. सिमीशी संबंधित एका व्यक्तीनेच ही माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर एटीएसने कारवाई केली आहे.
Comments
Add Comment

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी

भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !

बिल्डर लॉबीची अजब वागणूक भाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी वादाचे भाईंदरमध्ये पडसाद उमटले आहेत. भाईंदरमध्ये एका

कल्याण - डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी उपलब्ध

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतील कामांना गती देण्यासाठी राज्य नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर