उपसा सिंचन योजनेसाठी मंत्री विखेंचा महत्त्वपूर्ण निर्णय : आ. अमोल खताळ

संगमनेर : तालुक्यातील खांबे येथील कामधेनू सहकारी उपसा सिंचन योजनेसाठी आ.अमोल खताळ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून जॅकवेल घेण्यास जलसंपदा विभागाने मंजुरी दिल्याचे पत्र जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः येवून ग्रामस्थाकडे सुपूर्द केले.जलसंपदाच्या निर्णायमुळे खांबा गावाच्या पाणी प्रश्नातील मोठा अडथळा दूर झाला आहे.


खांबा गावाला वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.पाणी प्रश्न सुटावा म्हणून ग्रामस्थांनी आग्रही मागणी मंत्री विखे पाटील यांच्याकडे विधानसभा निवडणुकीपुर्वी केली होती.राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आ.अमोल खताळ यांनी या मागणीचा पाठपुरावा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे केल्यानंतर जलसंपदा विभागाने सादर झालेल्या प्रस्तावला शर्थी आणि अटी टाकून म्हैसगाव तास या पुलापासून मुळा धरणाच्या बुडीत क्षेत्रात साधारणपणे ५० ते ७५ मीटर अंतरावर मुळा धरणाच्या भीतींपासून २२ कि.मी.अंतरावर तीन गुंठे जागा जॅकवेल अप्रोच ब्रीज व पंप हाऊसचे काम करण्यासाठी जलसंधारण विभागास ना हरकत पत्र दिल्याने गावासाठी स्वतंत्र जॅकवेल घेण्याची मोठी अडचण दूर झाली आहे.खांबा गावाचा पाणी प्रश्न सोडविणार आशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी गावात झालेल्या कार्यक्रमात दिली होती. आ.अमोल खताळ यांनी यासाठी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.


रविवारी मंत्री विखे पाटील आणि आ.अमोल खताळ कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या उपस्थितीत खांबा गावचे सरपंच रविंद्र दातीर आणि ग्रामस्थांना हे पत्र सुपूर्द करण्यात आले.


संगमनेर तालुक्यातील पठार भागाला पाणी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते त्याची सुरूवात झाली आहे.अजून या प्रश्नावर खूप काम करायचे असून जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने दिलेल्या आश्वासनाची नक्की पूर्तता होईल आशी प्रतिक्रीया आ.अमोल खताळ यांनी व्यक्त केले.


सरपंच रविंद्र दातीर यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.अमोल खताळ यांच्या सहकार्याने खांबे गावाला मोठा दिलासा मिळाला असून लवकर जॅकवेल आणि पंप हाऊसचे काम करून गावासाठी पाणी आणण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची भावना व्यक्त केली.

Comments
Add Comment

खासदार नारायण राणे यांना वाढदिवशी मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा

कणकवली : नारायण राणे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेली भाषणे ऐकण्याची बघण्याची संधी मला प्राप्त

Nashik : नाशिक आणि जळगावच्या शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात

नाशिक : अवकाळी पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना पोलिसांची नोटीस

- कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास तीव्र  भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर

Crop registration : आता प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

डिजिटल क्रॉप सर्वेक्षण होणार; तलाठी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या जबाबदाऱ्या

'Operation Tiger' : खासदार फुटी’च्या अफवांचे सूत्रधार उबाठाचेच नेते!

अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’चे थोतांड; खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका मुंबई :

Pune FDA Action : पुण्यात एफडीएची कारवाई; मावळमध्ये भेसळयुक्त आंबा पल्प जप्त

पुणे : उन्हाळ्यात नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत