Saturday, June 21, 2025

कार पार्किंगची लिफ्ट कोसळली

कार पार्किंगची लिफ्ट कोसळली
मुंबई : बोरिवली (पश्चिम) येथील लिंक रोडवरील ओम प्रथमेश इमारतीतील कार पार्किंगची लिफ्ट शनिवार, ३१ मे रोजी सकाळी ११.०८ च्या सुमारास कोसळली. कोसळलेल्या लिफ्टखाली अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आणि त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.



त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून शुभम धुरीचा (३०) मृत्यू झाल्याचे घोषित केले, तर सुजित यादवच्या (४५) डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. सध्या मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी कार पार्किंगची लिफ्ट नेमकी कशी कोसळली? याबाबत चौकशी
करीत आहेत.
Comments
Add Comment