शहापूरची लेक इस्रोत शास्त्रज्ञ

  105

शहापूर : शहापूर तालुक्यातील शिरगांव गावातील सुजाता रामचंद्र मडके हिची इंडियन रिसर्च सेंटर (इस्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. सुजाताच्या संशोधनातून शहापूर तालुक्याचा झेंडा आता इस्रोमध्येही झळकणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाचा राजीनामा देऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) बेंगलुर (कर्नाटक) येथे शास्रज्ञ (राजपत्रित अधिकारी) या पदावर सुजाता रुजू झाली आहे.
इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण शिरगांव जिल्हा परिषद शाळेत झालेल्या सुजाताचा प्रवास प्रेरणादायी आहे.


सुजाताने शहापूर येथील ग. वि. खाडे विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करुन नंतर तिने (आयआयटी) खरगपूर येथे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या कार्यक्रमांतर्गत व्हच्र्युअल लॅब प्रोजेक्ट ३ मध्ये रिसर्च इंजिनिअर म्हणून काम केले आहे. त्यापुर्वी सुजाताची सहाय्यक अभियंता म्हणून महाजेन्को मध्ये निवड झालेली होती. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) मध्ये सायंटिस्ट बी पदाच्या मुलाखतीपर्यंत आणि भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी), ट्रॉम्बेच्या टेक्निकल ऑफिसर पदाच्या मुलाखतीपर्यंत तिने धडक मारलेली आहे. तसेच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत यश संपादन करुन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ठाणे येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत होती.


दरम्यान नुकतेच ती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), बेंगळुरूमध्ये सायंटिफिक ऑफिसर (एसओएससी) या पदावर रुजू झाली आहे.



इस्रोच्यावतीने सुजाताला मिळालेल्या संधीचा वडील म्हणून सार्थ अभिमान आहे. ग्रामीण भागात राहून केवळ प्रचंड मेहनत ,जिद्द व ध्येय बाळगल्यास निश्चित यशापर्यंत पोहोचता येते, असे सुजाताचे वडील रामचंद्र मडके यांनी म्हटले आले. निश्चितच शहापूरसाठी देखील ही अभिमानाची गोष्ट आहे.


मला इथंपर्यंत पोहोचता आले याचा मला आनंद आहे. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे होते. आईवडिल माझ्यामागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी केलेले संस्कार व मार्गदर्शन यामुळेच मला इस्रोपर्यंत पोहचता आले. - सुजाता रामचंद्र मडके

Comments
Add Comment

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार