कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज

५ हजार नागरिकांची तपासणी; ५० खाटा राखीव


विरार : कोरोना व्हायरस भारतात पुन्हा परतला आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ हजार २०० पर्यंत पोहोचली असून काही राज्यात मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. तसेच राज्यात मुंबई, ठाणे व इतर काही परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये व कोरोनाची लागण झालेल्या लोकांना इतरांपासून दूर ठेवता यावे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.



कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत पालिकेची रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, आयुष्यमान आरोग्य केंद्र, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे व वस्त्या इत्यादी ठिकाणी नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत ५५११ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ९६ जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली आहे. या तपासणीत एक कोरोना बाधित रुग्ण आढळला असून त्याला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये या दृष्टीने शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती, कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण माहिती महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत आहे.

महानगरपालिकेमार्फत कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची व विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जीवदानी रुग्णालय चंदनसार येथे २५ व फादरवाडी रुग्णालय, वसई पूर्व येथे २५ स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. आपत्कालीन वेळेला पालिकेने उभारलेल्या ५ ऑक्सिजन प्रकल्पांमधूनही ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था करण्यात येणार आहे. आयुक्ता अनिल कुमार पवार ,अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे ,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी यासंदर्भात बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या आहेत.
Comments
Add Comment

महापालिका प्रशासन लागले निवडणुकीच्या कामाला

विरार : महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका प्रशासन निवडणूक

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांना तीन दिवस बंदी

घोडबंदर मार्गावरील दुरुस्तीसाठी बदल पालघर : ठाणे - घोडबंदर मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीचे नियोजन न

एकाच वेळी संसदेत मांडली तीन विधेयक

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना यश पालघर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी निगडित तीन महत्त्वपूर्ण विधयके

न्याय मागणाऱ्या महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार

आरोपी हवालदारास अटक डहाणू : आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर

नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद

ग्रामीण भागातही ३० हजार दुबार मतदार

जिल्हा परिषदेच्या ५७ गटातील मतदारांचा समावेश पालघर : मतदार याद्यांमधील दुबार नावावरून सर्वत्र राजकीय वातावरण