पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील 'या' राज्यांमध्ये गुरूवारी मॉकड्रिल

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी असूनही, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान, उद्या गुरुवारी (दि.२९) पाकिस्तानला लागून असलेल्या राज्यांमध्ये नागरी संरक्षण मॉकड्रिल आयोजित केले आहे. हे मॉक ड्रिल गुजरात, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित केले आहे. या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देशही दिले जातील.


गुरुवारी(दि.२९) होणाऱ्या मॉक ड्रिलचा उद्देश संभाव्य दहशतवादी धोक्यांविरुद्ध तयारीची चाचणी घेणे आणि ओलिस संकट किंवा दहशतवादी हल्ल्याच्या बाबतीत सुरक्षा एजन्सींच्या प्रतिसाद धोरणाचे मूल्यांकन करणे आहे. त्यानुसार, गुरुवारी (दि.२९) मोठ्या प्रमाणात मॉकड्रिल करण्याची तयारी सुरू आहे. भारताच्या या सीमावर्ती भागात हवाई संरक्षण यंत्रणाही सतर्क आहेत. पाकिस्तानची दहशत आणि नियंत्रण रेषेवर होणारा गोळीबार पाहून भारतीय सैन्याने काश्मीरच्या 10 जिल्ह्यांमध्ये नियंत्रण केंद्रे स्थापन केली आहेत. आता अशातच सीमावर्ती भागात मॉक ड्रिल आयोजित केल्यामुळे पाकिस्तानही सतर्क झाला आहे.


पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे रोजी 'मॉक ड्रिल' करण्याचे निर्देश दिले होते.यामध्ये देशभरातील विविध राज्यांमध्ये आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या दहशतवादविरोधी पथके आणि कमांडोंनी वास्तविक दहशतवादी हल्ल्यासारख्या परिस्थितींचा सराव केला होता. गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, 'मॉक ड्रिल' दरम्यान करावयाच्या उपाययोजनांमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवणे, 'कोणत्याही हल्ल्याच्या' बाबतीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांना सुरक्षा पैलूंवर प्रशिक्षण देणे आणि बंकर आणि खंदकांची साफसफाई करणे समाविष्ट आहे.


भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या आणखी एका ऑपरेशनची पाकिस्तानला भीती आहे. भारताने आतापर्यंत फक्त 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील आणखी 12 दहशतवादी तळांची यादी भारताकडे आहे. यापूर्वीच भारताने स्पष्ट केले होते की, दहशतवाद्यांचे उर्वरित तळही नष्ट केले जातील.पहलगाम हल्ल्यानंतर, देशभरातील सुरक्षा एजन्सींना सतर्क ठेवण्यात आले आहे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविण्यात आल्या आहेत.


दरम्यान, भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत ६-७ मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर प्रतिहल्ला सुरू केला होता. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. लष्करी प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी गटांशी संबंधित १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले. त्या ऑपरेशनदरम्यान देशभरात मॉक ड्रिल राबविण्यात आले होते.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी