Saturday, June 14, 2025

सरळ सेवा भरतीतील सहायक अभियंत्यांची यादी होणार जाहीर

सरळ सेवा भरतीतील सहायक अभियंत्यांची यादी होणार जाहीर

मुंबई : महावितरणकडून सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे अभियांत्रिकी पदवीधारक (वितरण/स्थापत्य) ३४२ उमेदवारांची सहायक अभियंता पदासाठीची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. या निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणी दरम्यान अपात्र व गैरहजर तसेच नियुक्तीपत्रातील विहीत मुदतीमध्ये रुजू न झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणात महावितरण कंपनीच्या नियमाप्रमाणे प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.



महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात येईल. महावितरणच्या जाहिरात क्र. ०७/२०२३ अन्वये अभियांत्रिकी पदवीधारक (वितरण-३०२ व स्थापत्य-४०) सहायक अभियंता पदाच्या ३४२ जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली आहे. त्याप्रमाणे दि. १४ जानेवारी २०२५ रोजी सहायकअभियंता पदासाठी निवड यादी जाहीर करण्यात आली.



कनिष्ठ अभियंतापदी ९१ उमेदवारांना नियुक्तिपत्र


कनिष्ठ अभियंतापदी अभियांत्रिकी पदविकाधारक ९१ उमेदवारांची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार सरळ सेवा भरतीद्वारे ७२ तर अनुकंपा तत्त्वानुसार १९ उमेदवांराची निवड करण्यात आली आहे. अर्जासोबत या उमेदवारांना परिमंडलस्तरावर नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

Comments
Add Comment