Janjira Fort Close: मुरुड जंजिरा किल्ला पर्यटनासाठी होणार बंद! कारण आले समोर

अलिबाग: केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून, महाराष्ट्रात काही दिवसातच त्याचे आगमन होणार असल्याकारणामुळे, पर्यटकाच्या सुरक्षिततेचा विचार करून पुरातत्व खात्याने दिनांक 26 मे पासून जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद (Murud Janjira Fort Closed for Tourism) करण्याची घोषणा केली आहे.


सध्या राज्यभर अवकाळी पावसाने कहर केला आहे, समुद्रकिनार पट्टीवर देखील हवामान खात्याकडून अनेकदा अलर्ट जारी करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे मान्सूनच्या  ढगाळ वातावरणासोबत समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना धोका पोहोचण्याची शक्यता असल्याकारणामुळे, पुरातत्व खात्याद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.


खरे तर लहान मुलांची उन्हाळ्याची सुट्टी अद्याप संपलेली नाही. त्यामुळे, शिवाजी महाराजांचे गडकिल्ले दाखवण्यासाठी सर्वाधिक पालक मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जंजिरा किल्ल्यावर गर्दी करतात. सुट्टीच्या काळांत जंजिरा किल्ला पाहण्यासाठी प्रवेश द्वाराजवळ उतरताना प्रवाशांची होणारी कसरत लक्षात घेता, पावसाळ्यात त्याचे व्यवस्थापन करणे जिकरीचे ठरू शकते. खास करून पावसाळ्यात समुद्रात उंच उसळणाऱ्या लाटा, वादळ, हेलकावे यामुळे होऊ शकणारी दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्व विभाग आणि मेरिटाइम बोर्ड दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षितता म्हणून राजपुरी खाडीतील जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवतात. त्यामुळे पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पावसाळा संपण्याची वाट पहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या