Vaishnavi Hagawane Case: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य, 'कोणालाही सोडलं जाणार नाही, कडक कारवाई होणार’

  762

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी घेतली कस्पटे कुटुंबियांची भेट


पुणे: मुळशी येथे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारे आहे. सासरच्या जाचाला आणि अमानुष छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हीने आत्महत्या केल्या प्रकरणात अनेक नवनवीन खुलसे समोर येत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, यांच्यावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. दरम्यान,"ही घटना अतिशय दुर्दैवी असून, माणुसकीला काळीमा फासणारी आहे, या प्रकरणात कडक कारवाई केली जाईल",असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.



वैष्णवीच्या कुटुंबियांची एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कस्पटे कुटुंबाची भेट घेत वैष्णवीला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.



काय म्हणाले एकनाथ शिंदे?


समाज प्रगत झाला आहे, राज्यात अशा घटना घडणे वाईट आहे. अमानवी घटना आहे. नऊ महिन्याचं बाळ समोर असातना कोणतीच आई असं करू शकत नाही. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, पोलीस काम करत आहेत. घटनेला जबाबदार असणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नये. कुटुंबाची भावना लक्षात घेऊन राज्य सरकार कडक कारवाई करेल, अशा कोणत्याही घटनात राजकारण होता कामा नये, परिस्थिती बदलायला हवी, अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून कारवाई अपेक्षित आहे, त्यामुळे कठोर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, यामध्ये कोणीही असेल त्याला गृहविभाग सोडणार नाही, कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.


दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचं स्त्रीधन जप्त हगवणे कुटुंबीयांकडून जप्त केलं आहे, तसेच तिचा पती आणि तिचा दीर यांच्याकडे असलेलं परवानाधारक पिस्तूल देखील जप्त करण्यात आलं आहे,  तिच्या सासऱ्यानं (राजेंद्र हगवणे) पळून जाण्यासाठी जी कार वापरली होती ती देखील जप्त करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार