शुभमन गिल भारताचा ३७ कसोटी कर्णधार, देशाचा पाचवा तरुण कर्णधार

मुंबई : कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार असलेला भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अठरा क्रिकेटपटूंचा भारतीय संघ जाहीर केला आहे. शुभमन गिलची कसोटी संघासाठी कर्णधारपदी निवड झाली आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी रिषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. रिषभ पंत आणि ध्रुव जुरेल हे दोघे यष्टीरक्षक म्हणून संघाकडून खेळतील. करुण नायर, शार्दुल ठाकूर आणि साई सुदर्शन यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. पण मोहम्मद शमीला संघात स्थान मिळालेले नाही.

फेब्रुवारी २०२२ पासून भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मासोबत विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांनीही कसोटीला निरोप दिला आहे. या पार्श्वभूमीवर निवड समितीने रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर गिलची कर्णधारपदी नियुक्ती करत भारतीय क्रिकेटमधील नव्या युगाची सुरुवात केली आहे.

शुभमन गिल २५ वर्षे आणि २५८ दिवसांचा आहे. तो कसोटीत भारताचे नेतृत्व करणारा पाचवा सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. याआधी मन्सूर अली खान पतौडी (२१ वर्षे, ७७ दिवस), सचिन तेंडुलकर (२३ वर्षे, १६९ दिवस), कपिल देव (२४ वर्षे, ४८ दिवस) आणि रवी शास्त्री (२५ वर्षे, २२९ दिवस) यांनी लहान वयात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. मन्सूर अली खान पतौडी हा भारताचा र्वात लहान वयाचा कसोटी कर्णधार आहे. अद्याप त्याचा विक्रम कोणी मोडलेला नाही.

शुभमन गिलने पाच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्याने निवडक एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. या व्यतिरिक्त तो गुजरात टायटन्स या आयपीएल संघाचे नेतृत्व करत आहे. तो भारताचा ३७ वा कसोटी कर्णधार आहे.

भारताचे कसोटी संघांचे आतापर्यंतचे कर्णधार

सी. के. नायडू
विजयनगरम के महाराजकुमार
इफ्तिखार अली खान पतौडी
लाला अमरनाथ
विजय हजारे
विनू मंकड
गुलाम अहमद
पॉली उम्रीगर
हेमू अधिकारी
दत्ता गायकवाड
पंकज रॉय
गुलाबराय रामचंद
नरी काँट्रॅक्टर
एम के पतौडी
चंदू बोर्डे
अजित वाडेकर
एस वेंकटराघवन
सुनिल गावस्कर
बिशन सिंह बेदी
गुंडप्पा विश्वनाथ
कपिल देव
दिलीप वेंगसरकर
रवी शास्त्री
कृष्णमाचारी श्रीकांत
मोहम्मद अझरुद्दीन
सचिन तेंडुलकर
सौरव गांगुली
राहुल द्रविड
वीरेंद्र सेहवाग
अनिल कुंबळे
एम. एम. धोनी
विराट कोहली
अजिंक्य रहाणे
के. एल. राहुल
रोहित शर्मा
जसप्रीत बुमराह
शुभमन गिल (कसोटी कर्णधारपदी २४ मे २०२५ रोजी निवड)
Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक