Ajit Pawar: माझं मीच स्वच्छ करतो... उद्घाटन प्रसंगी अजित पवारांनी साफ केला सोफा

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सभामंडपात ठेवण्यात आलेला सोफा खराब असल्याने अजित पवार यांनी स्वतः आपल्या हाताने तो स्वच्छ केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांचा हा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.


नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान, अजित पवार जेव्हा स्टेजवर गेले तेव्हा तिथं बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या सोफ्यांवर धुळ बसली होती. त्यामुळे सोफ्यावर बसण्याआधी अजित पवारांनी स्वतः सोफा स्वच्छ केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार हे नेहमी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि मिश्कील वक्तव्यामुळे चर्चेत असतात. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार सतत कार्यकर्त्यांच्या गोतावळयात देखील पहायला मिळतात. असे असताना, अजित पवारांनी स्वत:हून फडके हातात घेऊन, आपले बसण्याचे आसन पुसल्याने हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.


अलिकडेच झालेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane Case) प्रकरणात मुख्य आरोपी असलेला राजेंद्र हगवणे (वैष्णवीचे सासरे) हे देखील अजित पवारांच्या गटातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचा एक कार्यकर्ता होता, ज्यामुळे या प्रकरणात अजित पवारांवरदेखील काहींनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कार्यकर्त्यांवर विसंबून राहण्यापेक्षा आपले काम आपणच करावे असा पवित्रा घेतला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

Comments
Add Comment

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली

हद्दपार गुंडाने शहरात वास्तव्य करत केला महिलेवर बलात्कार! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुणे: पु्ण्यात गुन्हेगारी क्षेत्रातील वाढ नवीन नसली तरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय