पवई तलावातील पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

जलपर्णी काढण्याच्या कामामुळे पक्ष्यांची अंडी उबवण्यात अडसर


मुंबई : गत सहा महिन्यांत सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. मात्र, पवई तलावात येथे कांस्यपंखी कमळपक्षी आणि जांभळी पाणकोंबडी यांचा अधिवास आहे. सामान्यपणे दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतचा कालावधी हा या पक्ष्यांचा प्रजोत्पादन तथा विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे या पक्ष्यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होवू शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येवू शकतो, असे मतप्रदर्शन बी.एन.एच. एस.प्रतिनिधींनी नोंदविले आहे.


पवई तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही सुरु आहे. गत सहा महिन्यांत सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. तरीही, जलपर्णी वाढीचा वेग अधिक असल्याने ती तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ज्या गतीने जलपर्णी काढली जात आहे, त्यापेक्षा कित्येक पट अधिक गतीने जलपर्णी वाढत आहे. एकूणच, जलपर्णीच्या आच्छादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पवई तलावात सांडपाणी, मलजल मिसळत असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणावर फोफावते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा आहे. जोपर्यंत मलजल वाहिन्या वळविण्याचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत जलपर्णी काढण्याची गती अधिक वाढविणे आवश्यक असल्याचे अभिजीत बांगर यांनी नमूद केले होते.



आजमितीला पवई तलावातील जलपर्णी काढण्याची कार्यवाही २ मशिनद्वारे सुरू आहे. ती अधिक प्रभावी होण्यासाठी तात्काळ ५ मशिन्स माध्यमातून जलपर्णी काढण्याचे काम सुरू करावे. त्यासाठी दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) अधिकचे मनुष्यबळ वापरून जलपर्णी हटविण्याच्या कार्यवाहीस अधिक वेग देण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर ६ मशिन्स तैनात करावीत. जलपर्णी काढल्यानंतर डम्पिंग ग्राउंडवर विनाविलंब विल्हेवाट लावली जाणार आहे.

पवई तलाव येथे कांस्यपंखी कमळपक्षी आणि जांभळी पाणकोंबडी यांचा अधिवास आहे. सामान्यपणे दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतचा कालावधी हा या पक्ष्यांचा प्रजोत्पादन तथा विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे या पक्ष्यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होवू शकतो, असे मतप्रदर्शन बी.एन.एच. एस.प्रतिनिधींनी नोंदविले.

Comments
Add Comment

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे