पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

  95

ऑनलाइन प्रक्रियेसाठी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन


मुंबई : राज्यातील १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल हाती आल्यानंतर विद्यार्थ्यांकडून पुढील करिअरच्या संधी शोधत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानंतर, आता १०वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कॉलेजला प्रवेश मिळविण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे.


मात्र, तांत्रिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अद्याप सुरुवात झाली नव्हती. "दहावी नंतर अभियंता होण्याचा मार्ग खुला करणाऱ्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया येत्या २० मे २०२५ पासून सुरू होत आहे," अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यामुळे, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.



पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम हा नोकरी आणि उद्योगासाठी उपयुक्त पर्याय असून, अल्पकालावधीत तांत्रिक कौशल्य मिळवून रोजगार किंवा उद्योजकतेकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण महत्त्वाचे आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक क्षमतांनी सज्ज करणाऱ्या या अभ्यासक्रमामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.


तंत्र शिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमांमध्ये १००टक्के प्रवेश सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. विद्यार्थ्यांना या शाखेकडे आकर्षित करण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे. दरम्यान, पॉलिटेक्निक महाविद्यालयातून डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकेच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो.


दरम्यान, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व वास्तुकला विषयक तीन वर्ष कालावधीच्या पदविका अभ्यासक्रमामार्फत विद्यार्थी तंत्रज्ञ, अभियंता व यशस्वी उद्योजक होऊ शकतात. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा तपशील, वेळापत्रक, नाव नोंदणी व अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहनही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Comments
Add Comment

मनोज जरांगे विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी युट्यूबरला काळं फासलं, कपडे फाडले

छत्रपती संभाजी नगर: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी एका

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात

मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाची मनाई

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे उपोषण करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मराठा

मुख्यमंत्री फडणवीसांच्या ओएसडीने घेतली मनोज जरांगेंची भेट, मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य