App: सिंधुदुर्गात रिक्षा प्रवाशांसाठी 'येतंव' अ‍ॅप!

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता रिक्षा प्रवाशांना महानगरातील 'ओला', 'उबेर' प्रमाणेच प्रवासासाठी घरबसल्या रिक्षा बुकिंग करता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने 'येतंव' हे प्रवासी रिक्षा अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. 'येतंव' अॅप रिक्षा चालक व प्रवाशांसाठी मोफत आहेत. रविवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली येथे या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा आता बदलत असून नागरिकांनी नव्याने निर्माण होणार्या सोयी-सुविधांचा लाभ घेतला पाहिजे. नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी तंत्रज्ञान आणि एआयचा वापर करीत आहे. विकासासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री राणे यांनी यावेळी केले. सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने व कणकवली तालुका व्यापारी संघाच्या समन्वयाने सोल्युशन प्रा. लि. यांच्या सहकायनि हे अ‍ॅप विकसित केले आहे.


कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या अ‍ॅपचे रविवारी लोकार्पण झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, माजी जिल्हाध्यक्ष विजय वळंजू, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, रिक्षा संघटना कोकण विभागाचे अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष नागेश ओरोसकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, झेंपॲप सोल्यूशन प्रा. लि. कंपनीचे सुबोध मेस्त्री, आनंद वामनसे आदी उपस्थित होते. ना. राणे म्हणाले, जगातील बहुतांशी देश तंत्रज्ञान आणि एआयचा वापर करत आहेत. भारतही यात आघाडीवर आहे. प्रसाद पारकर, नागेश ओरोसकर म्हणाले.


हे अ‍ॅप रिक्षा व्यावसायिक व ग्राहकांना लाभदायक ठरेल. झेंपॲपचे सुबोध मेस्त्री, आनंद वामनसे यांनी प्रझेंटेशनद्वारे या अ‍ॅपचा रिक्षा चालक व प्रवाशांनी कसा वापर करावा, याची माहिती दिली. यावेळी कणकवलीच्या माजी नगराध्यक्ष मेघा रेल्वे स्थानकावर थेट रिक्षाचालकांशी संपर्क साधता येणार आहे. गांगण, उपनगराध्यक्ष गणेश हर्णे, अशोक करंबेळकर, राजा राजाध्यक्ष, राजन पारकर, सुशील पारकर, नंदू उबाळे, प्रशांत बुचडे, विलास कोरगावकर, उद्योजक विशाल कामत, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्यासह व्यापारी व रिक्षा मालक, चालक उपस्थित होते.


रिक्षा चालकांनी असे वापरावे अ‍ॅप : रिक्षाचालकांनी या अ‍ॅपवर प्रथम लोकेशन टाकावे. यामुळे प्रवाशांना सर्च केल्यावर त्यांचे नाव व मोबाईल नंबर दिसणार आहेत. या अ‍ॅपद्वारे प्रवाशी रिक्षा कोठेही बोलवू शकतात.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग