आयएसआयएसशी संबंधित दोघांना अटक

मुंबई : एनआयएने पुण्यातील २०२३ च्या आयईडी प्रकरणात दोन फरार आरोपींना मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. हे दोघेही बंदी घातलेल्या आयएसआयएस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉडेलचे सदस्य आहेत. अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. अटक केलेले दोघे इंडोनेशियातील जकार्तात अनेक महिन्यांपासून लपले होते. तिथून भारतात परतताच त्यांना विमानतळावरून अटक करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच एनआयएने अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. दोन्ही आरोपींची ठोस माहिती देणाऱ्यास तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

एनआयएने पुण्यातील २०२३ च्या आयईडी प्रकरणात आधीच आयएसआयएसशी संबंधित आठ जणांना अटक केली आहे. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अटकेतील सर्व आरोपींवर देशात शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. हिंसाचार व दहशतीच्या मार्गाने भारत सरकारविरोधात युद्ध पुकारून देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप आरोपींवर आहे.

अब्दुल्ला फैयाज शेख याने पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घेतलेल्या घरात स्फोटके तयार केली होती. ही स्फोटके तयार करण्यासाठी त्याने २०२२ - २३ मध्ये प्रशिक्षण घेतले होते. पुण्यात तयार केलेल्या स्फोटकांची फैयाज शेख याने चाचणीही केली होती.

एनआयएने मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनुस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसीरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदवाला, शामील नाचन, आकिफ नाचन, शहनवाज आलमया आरोपींविरुद्ध यूएपीए, स्फोटके अधिनियम, शस्त्र अधिनियम आणि भारतीय दंड विधानच्या विविध कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले आहे.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये