प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल आता नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात झळकणार आहे. काजल अग्रवाल रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारत आहे. तर रावणाच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य सुपरस्टार यशची निवड करण्यात आलीय. रामायणात मंदोदरी हे एक महत्त्वाचं पात्र आहे. रामायणातील मंदोदरीची भूमिका साकारणंही तितकंच अवघड आहे. त्यासाठी निर्मात्यांना एक चांगली अभिनेत्री हवी होती. याच पार्श्वभूमीवर काजल अग्रवालची निवड करण्यात आलीय. काजलचे खूप चाहते आहेत. याचाही फायदा रामायण सिनेमाला होऊ शकतो.
रामायण हा सिनेमा दोन भागांमध्ये बनवला जातोय. त्यातला पहिला भाग दिवाळी २०२६ ला आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ ला प्रदर्शित होणार आहेत. रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवीची निवड करण्यात आलीय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे.
तहान भागवणारा, आरोग्य जपणारा माठ आहे गुणकारी आधीच उन्हाळा, त्यात अवकाळी. त्यामुळे उष्णतेत कमालीची वाढ झालीय. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. घसा ...
काजल अग्रवालचे काही महत्त्वाचे चित्रपट
मगधीरा, सिंघम,थुप्पक्की, मर्सल, आर्य २, मिस्टर परफेक्ट, डार्लिंग, सिकंदर इतक्या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये अतिशय चांगली भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल अग्रवाल रामायण सिनेमात मंदोदरीची भूमिका कशी साकारते, मंदोदरी पात्राला किती न्याय देते, याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय.