शस्त्रसंधी झाली पण सायबर हल्ले सुरुच! भारतावर तब्बल १.५ कोटी सायबर हल्ले

मुंबई : शस्त्रसंधी करुन पाकिस्तानसोबत लष्करी तणाव कमी करण्याचा निर्णय जरी झाला असला, तरी भारतावर सायबर हल्ल्यांचा मारा सुरूच आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. फक्त एप्रिल २२ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल १.५ कोटी सायबर हल्ले झाले असून, त्यापैकी १५० हल्ले यशस्वी ठरले.


सायबर हल्ल्यांमागे पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि मध्यपूर्वेतील देशांचा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डेटा चोरी, विमान आणि महापालिकेच्या यंत्रणा हॅक, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हल्ला अशा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



फेक न्यूजविरोधात मोहिम सुरू


'नेशन फर्स्ट, फॅक्ट फर्स्ट' मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र सायबरने सोशल मीडियावरील ८३ बनावट पोस्ट्सपैकी ३८ पोस्ट हटवल्या आहेत. भारतीय लष्कर व सरकारविरोधात फेक न्यूज प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला.



सायबर फ्रॉडविरोधात हेल्पलाइन सक्रिय


ऑनलाईन फसवणुकीविरोधात जनजागृतीसाठी १९३० आणि १९४५ या हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या असून, दररोज ७,००० हून अधिक कॉल्स येत आहेत. तातडीने प्रतिसाद देणाऱ्या १०० लाईन्स या नंबरवर काम करत आहेत. २०१९ पासून सायबर फ्रॉडमधून तब्बल ₹६०० कोटी वाचवले गेले असून, केवळ मागील सहा महिन्यांतच ₹२०० कोटींची बचत झाली आहे.



सायबर गुलामगिरीतून सुटका


सायबर क्राईमच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. लाओसमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या महाराष्ट्रातील सहा तरुणांची सुटका करण्यात आली आहे. या तरुणांना वीजेचे झटके देणे, नखे उपटणे अशा अमानुष छळाचा सामना करावा लागत होता.



CA विद्यार्थ्याकडून धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट


दरम्यान, इंदोरमधून ३९ वर्षीय CA विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. तो २०२१ पासून सात सोशल मीडियावर हिंदू देवतांविषयी अपमानास्पद पोस्ट करत होता. ही बाब राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.