जगप्रसिद्ध साई मंदिरात हार, फुल, प्रसाद बंदीचा निर्णय : गोरक्ष गाडीलकर

कृष्णा पॉल (एपिडी, शिर्डी विमानतळ )


शिर्डी : भारत पाकिस्तान युद्धजन्य परी स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साई संस्थान प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून रविवार दि.११ में २०२५ पासून जगप्रसिद्ध साई समाधी मंदिरात फुलहार, प्रसाद नेण्यास मनाई असणार आहे.या निर्णयाची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.


दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सुरक्षितेतच्या दृष्टीने शिर्डीत साई संस्थानच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला.याप्रसंगी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अतिरिक्त पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पी.आय प्रदीप देशमुख आधीच संस्थांचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.यावेळी साई मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शिर्डीत देश-विदेशात दररोज हजारो भक्त साई समाधीच्या दर्शनासाठी येतात, फुलहार आणि प्रसाद साई समाधीवर चढवतात, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना फुलहार आणि प्रसाद साई समाधी मंदिरात नेण्यास आता मनाईचा असणार आहे. तसा निर्णय पुढील आदेशापर्यंत घेण्यात आला आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साई संस्थानला धमकीचा मेल देखील प्राप्त झाला आहे. या अगोदर अनेकदा धमकीचे पत्र देखील साई संस्थानला मिळाले आहेत. परंतु यावेळची परिस्थिती वेगळी आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावाची परिस्थिती आणी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा 'अलर्ट मोड'वर ठेवण्यात आली आहे.पवित्र सुवर्ण मंदिर असलेल्या अमृतसर शहरावर पाकिस्तानने ड्रोनचा हल्ला चढवला होता.भारतीय लष्कराने हा हल्ला निष्फळ केला. परंतु या हल्ल्यांमुळे पाकिस्तान भारतातील धार्मिक स्थळ टार्गेट करत असल्याचे निश्चित झाले.यामुळे भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच, युद्धजन्य स्थितीमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षितेतचा वाढ करून त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सुरक्षिततेचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस यंत्रणेला कडक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून सुरक्षिततेच्या दृष्टीने जागतिक किर्तीचे देवस्थान असलेल्या शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थानने हार, फुल, प्रसाद बंदीचा मोठा निर्णय घेतला आहे.



साई मंदिर सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतला आढावा भारत पाक युद्ध परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर केंद्र आणी राज्य सरकारच्या आदेशानुसार अंतरराष्ट्रीय साईबाबा विमानतळावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. शिर्डी विमानतळवरून नियमित येणाऱ्या जाणाऱ्या प्लाईट सुरु ठेवण्यात आल्या असून यामध्ये अद्यापतरी कोणताही बदल केला नाही.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद